जयस्तंभ चौकातील भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 13:-स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयस्तंभ चौकात ट्रक ट्रेलर,ऑटो व दुचाकी अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रात्री 10 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव सार्थक अग्रवाल वय 20 वर्षे रा महावीर नगर,रणाळा, कामठी असे आहे.तसेच सदर मृतक हा अभियांत्रिकी विद्यार्थी होता हे इथं विशेष!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा आपले कामे आटोपून स्वगृही जाण्यासाठी दुचाकी क्र एम एच 40 सी डब्लू 8304 ने जयस्तंभ चौक मार्गे जात असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात तीन चाकी ऑटो तसेच ट्रक ट्रेलर क्र एम एच 40 सी डी 7037 ने दिलेल्या धडकेत घडलेल्या गंभीर अपघातात सदर तरुणाचा जागीच मृत्यू झाला.घटना घडताच ऑटो चालक ऑटो घेऊन पसार झाला तसेच ट्रक ट्रेलर चा चालक ट्रक ट्रेलर जागीच सोडून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय च्या शवविच्छेदन गृहात हलविण्यात आले.
पोलिसांनी यासंदर्भात पोलिसांनी पसार अज्ञात ऑटो चालक तसेच ट्रक ट्रेलर चालक विरुद्ध बीएनएस कलम 281,106 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महाराष्ट्राच्या विकासासाठी थिंक टॅंक म्हणून ‘मित्र’ कार्यरत, महाराष्ट्र एक ट्रीलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करणार

Tue Aug 13 , 2024
– कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा, ऊर्जा क्षेत्रावर ‘मित्र’ने विशेष लक्ष केंद्रित करावे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश • ‘मित्र’ची नियामक मंडळाची बैठक संपन्न मुंबई :- राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रीलीयन डॉलर होण्याचे उद्दिष्ट साध्य करतानाच ‘मित्र’ ने कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा, ऊर्जा या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करावे. जेणेकरून नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि राज्याच्या विकासाला देखील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com