इस्कॉन मंदिरात जन्माष्टमी उत्सव आज

नागपूर :- एम्प्रेस मॉल परिसरातील इस्कॉनच्या श्री श्री राधा गोपीनाथ मंदीर गेट नंबर 2 एम्प्रेस मॉल कंपाउंड मध्ये भव्य आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात गुरुवार ला जन्माष्टमी उत्सव साजरा केला जाईल. इस्कॉन चे झोन सचिव हरिकीर्तन दास यांनी मंगळवारी पत्र परिषदेत ही माहिती दिली. पहाटे 4:30 वाजता भगवंतांची आरती व भोग अनुष्ठान होईल. त्यानंतर सकाळी महारथी भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात येईल. दिवसभर भगवंताचे दिव्यरूप, दर्शन, कीर्तन, अशा विविध धार्मिक कार्यक्रमाद्वारे आनंदमय उत्सव साजरा करण्यात येईल. त्यानंतर प्रसाद वितरण केले जाईल. प्रवचन, अध्यात्मिक अनुभव देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आकर्षक शोभाचित्रांनी आणि मंदिराचा परिसर सजविला असून त्यांची अनुभूती भाविकांना होईल. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना भक्तीच्या उत्सवात सहभाग घेता येईल. मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा महा अभिषेक करण्यात येईल. याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने या उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन इस्कॉन तर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मागील 88 वर्षांपासून श्रीकृष्ण मूर्ती स्थापनेची परंपरा अजूनही कायम

Thu Sep 7 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्व कामठी तालुक्यात हर्षोलहासाने साजरा कामठी :- जीवनाचे खरे तत्वज्ञान सांगणारा ,प्रेम माणुसकी शिकविणाऱ्या अश्या श्रीकृष्णावर असणारी श्रद्धा कायमस्वरूपी मनात बाळगून असलेल्या कामठी शहरातील रावेकर कुटुंबियात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा दरवर्षी साजरा करण्यात येतो तर मागील 88 वर्षांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्वा निमित्त श्रीकृष्ण मूर्ती स्थापनेची परंपरा ही आजही कायम आहे.कामठी येथील राम मंदिर परिसर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com