अमरदिप बडगे , प्रतिनिधी
गोंदिया :- तिरोडा तालुक्यातील इंदोरा बु प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जन आरोग्य समिती सभा जिल्हा परिषद सदस्य चतुरभुज बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यासभेत उपसभापती हुपराज जमईवार, डॉ. चैतलाल भगत पंचायत समीती सदस्य, ज्योती शरनागत,सुनंदा भगत,डॉ. स्वाती घोरमारे तालुका वैद्यकीय अधिकारी, तिलोतमा चौरे,दुर्गा शरनागत, हस्त राज पारधी शकुंतला दानवे, भावना कावळे, डॉ. आदित्य दुबे,डॉ. शि्वकुमार हरीनखेडे, डाँ.रजनिश डोंगरे,मनोज भुरे,अर्चना कांबळे एम एस कुरेशी, सी बी भगत, व्ही डी मडावी, बी जी भगत,भिमशंकर पारधी,देवेद्र पारधी, उपस्थित होते. सभेत प्राथमिक केंद्रात धर्मशाळा, इमारत, इलेक्ट्रीक दुरुस्ती, पाईपलाईन पाणी पुरवठा, शौचालय, गटर, रंगरगोटी,करणे, प्रतिनियुक्तीवर गेलेले डॉ. काचंन रांहगडाले यानां स्थानिक जागी वापशी पाटवणे,अर्जुनी उपकेंद्र येथील आरोग्य सेविका यांना पण स्थानिक केंद्रात वापशी पाटविण्यात यावे व बुस्टर डोज बदल अमुत महोत्सव हर घर तिंरगा या बदल प्रचार प्रसार करण्यासाठी सर्व जनप्रतिनिधि व अधिकारी यांनी प्रयत्न करावे तसेच उपस्थित उपसभापती हुपराज जमईवार ,सुंनदा पटले,ज्योती शरनागत, यांनी बुस्टर डोज देण्यात आले. विविध विकास कामावर चर्चा करण्यात आली. संचालन भावना साकुरे यांनी व आभार डॉ.शिवकुमार हरीनखेडे यांनी मानले.