विविध देशांमधील भारताच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट ; ४ मराठी भाषिक राजदूतांचा शिष्टमंडळात समावेश 

मुंबई :- विविध देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ राजदूत व उच्चायुक्तांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट देऊन आपल्या कार्याची माहिती दिली. शिष्टमंडळामध्ये ४ मराठी भाषिक राजदूतांचा समावेश होता.

भारताच्या कंबोडियातील राजदूत डॉ. देवयानी खोब्रागडे, जकार्ता येथे मुख्यालय असलेल्या एसियान दूतावासातील भारताचे राजदूत जयंत खोब्रागडे, चेक गणराज्यातील भारताचे राजदूत हेमंत कोटलवार, इराक येथील भारताचे राजदूत प्रशांत पिसे, चिली येथील भारताचे राजदूत सुब्रत भट्टाचारजी, केमरुन येथील उच्चायुक्त आनिंद्य बॅनर्जी, मलेशियातील उच्चायुक्त बी एम रेड्डी व बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त प्रणय कुमार वर्मा यावेळी उपस्थित होते.

राजदूत व उच्चायुक्तांची त्यांची पदस्थापना असलेल्या देशाचे भारताशी संबंध, प्रयतन व शैक्षणिक सहकार्य, त्या देशांमधील भारतीयांची स्थिती, संबंधित देशांसोबत भारताचे व्यापार – वाणिज्य व सांस्कृतिक संबंध याबाबत राज्यपालांना माहिती दिली.

कंबोडिया येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जगातील सर्वात मोठ्या अंकोर वाट येथील प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य भारत युनेस्कोच्या माध्यमातून करीत असून भारत व कंबोडिया मध्ये थेट विमानसेवा सुरु झाली तर त्यातून पर्यटन, आर्थिक तसेच सांस्कृतिक सहकार्य वाढेल असे डॉ. देवयानी खोब्रागडे यांनी सांगितले. मुंबई व सिंहानूक शहरांमध्ये भगिनी – शहरे करार व्हावा या दृष्टीने आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वच आसियान देशांमध्ये भारतीय संस्कृतीची ठळक छाप असल्याचे राजदूत जयंत खोब्रागडे यांनी सांगितले.

भारताच्या विविध देशांमधील दूतावासांचे प्रमुख केवाडिया, गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या १० व्या वार्षिक परिषदेत भाग घेण्यासाठी भारतभेटीवर आले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्लास्टीक पन्नी वापरावर मनपाची कारवाई २०० ते ३०० किलो प्लास्टीक जप्त

Tue Oct 18 , 2022
चंद्रपूर :- प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून अंदाजे २०० ते ३०० किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले असुन ९००० रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत बाजार परिसरातील व्यवसाय प्रतिष्ठाने, दुकाने यांची कसून तपासणी करण्यात आली. प्लास्टीक व तत्सम साहित्य जप्त करून प्लास्टीकचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com