आदर्श हायस्कुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- आदर्श हायस्कुल आणि आयडियल काॅन्व्हेंट हिंदी प्रायमरी शाळा यांचा संयुक्त विद्यमाने शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

शुक्रवार (दि.२१) जुन २०२४ ला आदर्श हायस्कुल आणि आयडियल कॉन्व्हेंट हिंदी प्रयमरी शाळा कन्हान येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मुख्याध्यापक जी.डी.यादव आणि मुख्याध्यापिका सुनिता देशमुख यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

शिक्षिका पूजा तिवारी यांनी स्वतःचे अनुभव कथन करून सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी योगाची विविध आसने केली. मानवासाठी योग किती महत्त्वाचा आहे आणि योगाशिवाय मानवी आरोग्य किती अपुर्ण आहे यावर शिक्षिका पुजा तिवारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून आंतरराष्ट्रीय योग दिवस थाटात उत्साहाने साजरा करण्यात आला. शेवटी अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पिपरी बुद्ध बिहारात आंतरराष्ट्रीय योग दिवस थाटात साजरा

Sat Jun 22 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- शहरातील प्रभाग क्र. ६ पिपरी येथे बुद्ध बिहारात नगरसेविका संगिता खोब्रागडे यांनी आंतर राष्ट्रीय योग दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून योग दिवस थाटात साजरा केला. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित आरोग्य वर्धीनी लता दुधबाडे, आरोग्य सेवक विलास सहारे, जि प शाळेची शिक्षिका भारती हुमने सह मान्यवरांचा हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com