संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
कामठी :- सध्याच्या स्थितीत बदलत्या वातावरणाचा परिणाम कामठी तालुक्यातील सोयाबीन व कापूस पिकावर होताना दिसुन येत आहे. यावेळी कित्येक सोयाबीन उत्पादकांच्या शेतात ऍलोमोझ्याक प्रादूर्भाव आढळून येत आहे तसेच काही कपाशीच्या पिकावरील गुलाबी बोण्ड अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे तरी या दोन्ही पिकांवरील रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने सर्वेक्षण करून शेतात भेटी देत पिकावर प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले .
सोयाबीनवरील रोग व कपाशीच्या पिकावरील गुलाबी बोंड यांची ओळख कशी करायची याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करावी ,बोंड अळी नियंत्रणासाठी कामगंध सापडे लावणे,सोयाबीन वरील ऍलोमोझ्याक व खोड माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.