दिव्यांगानां दर महीना पाच हजार ₹ अनुदान दया, दिव्यांगांचे भाजपा प्रदेशांध्यक्षा ना निवेदन

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी प्रतिनिधि 10 नोव्हेबर — दिवसेंदिवस महागाई वाढत असून दिव्यांगांचे जगणे असहय होत आहे सध्या शासना द्वारे दिव्यांगाना एक हजार ₹ मासिक अनुदान देण्यात येते या तुटपूंज्या अनुदानात संसाराचा गाड़ा चालविणे अशक्य आहे,त्यामुळे शासनाने दिव्यांगाना मासिक पाच हजार ₹ अनुदान दयावे अश्या मागणीचे निवेदन विधान परिषद सदस्य आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बुधवारी (9 नोव्हेबर ) ला दुपारी देण्यात आले

आत्मनिर्भर दिव्यांग वेलफेयर सोसायटी चे मार्गदर्शक उज्ज्वल रायबोले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवेदना द्वारे दिव्यांगां चे अनुदान दर महिन्यात 5 तारखे पर्यंत अदा करावे, बैंक-तहसील कार्यालय आणि कोषागार दरम्यान समन्वय ठेवावा, शासकीय कार्यालयात दिव्यांगां साठी रैंप बनवावे आणि दिव्यांगांना शासकीय कार्यालयात सनमानाची वागणुक दयावी या प्रमुख मागण्या केल्या

दिव्यांगांच्या शिष्टमंडळात विजय फुले, अरुण पौनिकर, सुनिल हजारे, परमानंद मेश्राम,सुभाष राऊत,अशोक चव्हान, धिरज वंजारी, गणेश सायरे, सुशिला हजारे,सिमा पानतावणे,वृदां राऊत,शौकत अली,वसिम हैदरी, शेख अशफाक, गजानन दोरसेटवार, प्रफुल ऊके, अरुण मानवटकर यांचा समावेश होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

खैरी गावातील 18 आरोपीवर गुन्हा दाखल..

Thu Nov 10 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 10 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी गावात एका विधवा महिला व तिच्या 17 वर्षीय मुलीवर हल्ला करून मारझोड करीत विनयभंग करणाऱ्या खैरी गावातील 18 लोकांवर भादवी कलम 354,294,323,143,147 सहकलम पोक्सो 8/12 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीमध्ये फिर्यादी पीडित महिलेचा सख्खा भाऊ व मुलाचा समावेश आहे तसेच आरोपीसंख्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com