संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पावसाळा सुरू झाला असून वातावरणातील बदलामुळे कामठी तालुक्यातील नागरिकांच्या प्रकृतीवर व्हायरल इन्फेक्शनचा परिणाम झाल्याने उपचारासाठी खाजगी अन सरकारी रुग्णालयात मोठी गर्दी दिसून येत आहे.
अनेक नागरिकांना खोकला,सर्दी, ताप,अंगदुखी ,गरगरणे यासारखे परिणाम दिसून येत आहेत.लहान बालकापासून ते अबाल वृद्धांपर्यंत साऱ्यांनाच या समस्येला तोंड द्यावे लागत आहे व्हायरल इन्फेक्शन चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून अनेकांकडून खाजगी सह उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली जात आहे.केवळ तरुणच नव्हे तर लहान बालकांच्या प्रकृतीवर देखील मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.सर्दी,खोकला ,अंगदुखी, चक्कर येणे,अशक्तपणा येणे यासारखे परिणाम दिसून येत आहे तर काहींना तीव्र स्वरूपाची घसा दुःखी देखील सुरू झाली आहे.व्हायरल इन्फेक्शन ची लागण झाल्यानंतर काही दिवस योग्य उपचार घेणे गरजेचे आहे अन्यथा पुन्हा प्रकृतीत बिघाड देखील होऊ शकतो.