– मनपाची ६ केंद्रे व महिला बचत गटांमार्फत वितरण
चंद्रपूर :- शासनाच्या सुचनेप्रमाणे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा ’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज उंचावीणे अपेक्षित आहे. मनपा संलग्न कार्यालये व महीला बचत गट मार्फत नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यासाठी मनपा प्रशासनाने नियोजन केले आहे. याअंतर्गत ९ ऑगस्ट रोजी मनपा मुख्य कार्यालय येथे राष्ट्रध्वज वितरण केंद्राचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
नागरीकांना ध्वज सहजतेने उपलब्ध व्हावा यादृष्टीने महानगरपालिकेतर्फे नियोजन करण्यात आले असुन मनपाची मुख्य इमारत, ३ झोन कार्यालये, आझाद गार्डन चौक येथील बेघर निवारा केंद्र, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय ज्युबिली हायस्कूल अश्या ६ केंद्रांवर ध्वज वितरण सुरु करण्यात आली असुन मनपाच्या सहकार्याने ४० महीला बचत गटांमार्फत सुद्धा ध्वज वितरण केले जात आहे. ध्वजसोबतच राष्ट्रध्वजाचा वापर व सन्मान कसा करावा यासंबंधी ध्वजसंहिता असलेले परिपत्रक सुद्धा दिले जात आहे.
देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा हर घर तिरंगा अभियानाचा उद्देश आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आपल्या घरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा करून अभियानात सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.या उद्घाटनप्रसंगी उपायुक्त मंगेश खवले,मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे, विधी अधिकारी अनिल घुले, उपअभियंता रवि हजारे, विकास दानव,रफीक शेख,डॉ. नरेंद्र जनबंधू , प्रदीप पाटील, रोशनी तपासे,अनिल बनकर, मयुर मलिक व कर्मचारी उपस्थित होते.