सोनी समाज मित्र मंडळाने घेतले पाच क्षयरुग्ण दत्तक

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील सोनी समाज मित्र मंडळ या संस्थेद्वारे पुढाकार घेत पाच क्षयरुग्णांना दत्तक घेण्यात आले आहे. शुक्रवारी (ता.९) सदर येथील शहर क्षयरोग कार्यालयामध्ये सोनी समाज मित्र मंडळ संस्थेचे अध्यक्ष सुरेश सोनी अध्यक्षतेत कार्यक्रम पार पडला. यावेळी शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी,उदय सोनी, संदीप सोनी आदी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेतर्फे क्षयरुग्णांच्या पोषण आहारासाठी समाजातील सेवाभावी संस्था, नागरिकांनी पुढे येणाचे आवाहन करण्यात आले होते. मनपाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सेवाभावी संस्था पुढे येउन क्षयरुग्णांच्या पोषण आहारासाठी सहकार्य करीत आहेत. शुक्रवारी सोनी समाज मित्र मंडळाने देखील या कार्यात सहकार्य करीत पाच क्षयरुग्णांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली.

क्षयरुग्णांमध्ये पोषक आहार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. केंद्र शासनाच्या प्रति व्यक्ति प्रति महिना मोहिमेंतर्गत क्षयरुग्णांना आवश्यक धान्य, कडधान्य, डाळी, तेल इत्यादी साहित्य हे दिल्यास त्यांच्या शरीरात प्रोटीनची पूर्तता होते व औषधोपचाराला दाद देत रुग्ण लवकर बरा होउ शकतो.

समाज बांधव सुरेश सोनी, मनीष सोनी, प्रमोद वर्मा, ॲड. पूनम सोनी, प्रकाश वर्मा, सुनिल सोनी, गोपाल जरगर व संदीप सोनी यांच्या आर्थिक सहकार्याने क्षयरुग्णांना मदत करण्यात आली आहे. मनपा कार्यक्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, जनप्रतिनिधी व शासनाच्या अधिनस्त असणारे अधिकारी व कर्मचारी यांनी एक किंवा दोन क्षयरुग्ण दत्तक घेउन त्यांच्या पोषण आहाराची उपचार कालावधीत पूर्तता केली तर १०० क्षयरुग्णांना पोषण आहार मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत सोनी समाज व क्षयरोग नियंत्रण सोसायटीतर्फे आपले शहर क्षयमुक्त होण्याकरीता सर्वांनी पुढाकार घेउन योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.

नागपूर मनपा कार्यक्षेत्रामध्ये १०१ निक्षय मित्रांची नोंदणी झालेली आहे. मनपा कार्यक्षेत्रामध्ये टीबीचे एकूण ७८६१ रुग्ण शासकीय आणि खाजगी स्तरावर उपचार घेत आहेत. आतापर्यंत नागपूर मनपा कार्यक्षेत्रामध्ये ६३९२ क्षयरुग्णांना पोषण किट वितरीत करण्यात आलेली आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, नागपूर शहराअंतर्गत असलेल्या क्षयरुग्णांना दत्तक घेउन त्यांना पोषण आहाराकरीता मदत करून त्यांना क्षय या आजारापासून मुक्त करावे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एसएमएफजी इंडिया क्रेडिट छठा वार्षिक पशु विकास दिवस आयोजित करेगा; महाराष्ट्र के 57 केंद्रों में 13,000 से अधिक मवेशियों का इलाज करने की तैयारी 

Sat Feb 10 , 2024
-10 फरवरी, 2024 को पशु विकास दिवस (पीवीडी) के छठे संस्करण का आयोजन करेंगे, जिसमें विशेषतया ग्रामीण भारत में डेयरी फार्मिंग में महिलाओं की भूमिका का सम्मान करने का उत्सव मनाया जाएगा। 15 राज्यों में 450 से अधिक स्थानों पर पशु शिविर आयोजित किए जाएंगे और एक ही दिन में 1 लाख से अधिक मवेशियों का इलाज करने का लक्ष्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com