नागपूर :- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी तहसिलदार महेश सावंत, नायब तहसिलदार आर. के. डिघोळे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.