नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील सेपक टॅकरा स्पर्धेचे गुरूवारी (ता.१२) सायंकाळी उद्घाटन झाले. नरेंद्र नगरच्या लक्षवेधन झालेल्या उद्घाटन समारंभाला माजी रणजी क्रिकेटपटू प्रशांत पंडीत, माजी राष्ट्रीय कबड्डीपटू धनंजय वाडेकर, आंतरराष्ट्रीय सायक्लेथॉन खेळाडू संजना जोशी, राष्ट्रीय जलतरणपटू भावना गगने, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, यांची विशेष उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय वेळूकर, माजी नगरसेवक अविनाश ठाकरे, किशोर वानखेडे, संदीप गवई प्रकाश भोयर, नागेश मानकर, माजी नगरसेविका विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, स्पर्धेचे कन्व्हेनर सचिन माथने, समन्वयक भूषण केसकर, क्रीडा शिक्षक जयंत जिचकार, सेपट टॅकरा संघटनेचे विपीन कामदार, अमृता पांडे, भूषण केसकर, संजय पवनीकर आदी उपस्थित होते.