कुही हद्दीत प्रॉपर्टीच्या वादातून खून करून पसार होणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

कुही :- कुही हद्दीत मौजा पाचगाव शिवार येथे दि. २१/०१/ २०२४ रोजी यातील मृतक नामे विनोद अशोक बोंदरे वय अंदाजे ३७ वर्षे, रा. प्लॉट नं.१६, टेलीफोन नगर, दिघोरी, नागपुर याला व्यवसायिक भागीदार मुख्य आरोपी नामे सचिन परसराम फेंडरकर वय अंदाजे ३७ वर्षे, रा. लाखनी ह. मु. नागपुर याने त्याचे इतर ०२ साथीदारांसह संगणमत करून मृतक याचेशी असलेल्या प्लॉट विकीचा व्यवहारातील पैशाच्या वादातून मृतक याला पाचगाव शिवार येथे प्रोपर्टी दाखविण्याच्या बहाण्याने नेवुन धारदार हत्याराने व चाकुने शरीरावर अनेक ठिकाणी वार करून जिवानीशी ठार मारले. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोटवरून पोस्टे कुही अप क्र. १८/२४ कलम ३०२, ३४ भादंवि प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोहार (भा.पो.से.) यांनी स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण विशेष पथक तयार करुन आरोपोंचा शोध घेण्याचे आदेश दिले.

सदर खुनाच्या गुन्हयाचे समांतर तपासा दरम्यान वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाद्वारे नागपूर शहर तसेच नागपूर ग्रामीण जिल्हयातील वेलूतर, कुही, भिवापूर, उमरेड भागात शोध घेत असतांना आरोपींची माहिती घेवुन सतत शोध घेत फिरत असताना दिनांक २१/०१/२०२४ रोजी रात्री दरम्यान गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, विनोद उर्फ गोटू अशोकराव बोन्द्रे, रा. नागपूर यांचा खून करून आरोपी भंडारा जिल्ह्यातील पवनी भागात स्कार्पिओ वाहन क्र. एम. एव-३१/डब्ल्यू एस-०००१ मधुन पळून गेले आहे. अशी खात्रीपूर्वक माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके सदर भागांनी तातडीने वेगवेगळ्या रोडनी रवाना होवुन सदर भागात आरोपीचा शोध करीत असता आरोपी हे त्यांचे स्कार्पिओ वाहनाने पळुन जात असतांना दिसल्याने त्यांचा पाठलाग करून आरोपींना वाहनासह पकडून आरोपी नामे-१) सचिन परशराम फेडरकर, वय ३७ वर्ष, रा. ह. मु. नागपुर २) रोशन बालाजी बोकडे, वय ३५ वर्ष, रा. नागपूर ३) मृणाल/मोंटू अरुण भोयर वय २६ वर्ष, रा. चिखली पुनर्वसन त. कुही यांना विचारपूस केली असता मुख्य आरोपीने सांगितले की, प्रोपर्टी व्यवसायातील पैशाचे व हिशोबाचे कारणावरून मृतकाने आरोपीस खुप खालच्या स्तरावर शिवी देवून अपमान केला होता, याचा राग मनात धरून त्याने त्याचे इतर दोन साथीदारांना सोबत घेवुन खुन केल्याचे सांगितले. सदर गुन्हयात अथक परीश्रम घेवुन व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना अवघ्या १२ तासाचे आत आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. तीन आरोपी व गुन्हयात वापरलेले स्कार्पिओ वाहन क्र. एम.एच-३१/डब्ल्यू एस ०००१ किंमती ८,००,०००/-रू, व कागदपत्रे पुढील तपास प्रक्रियेकरिता पोलीस स्टेशन कुही यांच्या ताब्यात देण्यात आले असुन आरोपी हे दि. २५/०१/२०२४ पावेतो पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भोरटेकर हे करीत आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे स्था. गु.शा. पोलीस हवालदार अरविंद भगत, गजेंद्र चौधरी, मयुर ढेकले, संजय बांते, पोलीस शिपाई राकेश तालेवार, चालक पोशी आशुतोष लांजेवार, सुमित वांगडे, सतिश राठोड यांनी पार पाडली.

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपींना अटक, वाहनासह एकूण ५०,६०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

Tue Jan 23 , 2024
– पोलीस स्टेशन भिवापूरची कारवाई भिवापूर :- पो, स्टे. भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग व वाहतूक केसेस करीत असताना नीलज फाट्याकडून भिवापूरकडे १० चक्का टिप्पर ट्रक क्र. MH-36/AA- 2182 व टिप्पर ट्रक क्र. MH-40/BL-1649 हे येताना दिसले त्यांचा पाठलाग करून भिवापूर बस स्टॅन्ड समोर भिवापूर येथे थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये दोन्ही टुक मध्ये अंदाजे ०६ ब्रास रेती मिळून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com