नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – मंत्री धर्मरावबाबा आत्राम

– पूरग्रस्त भामरागडची पाहणी

गडचिरोली :- जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर येवून अनेक भागात नागरिकांचे घर व शेतीचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले.

मंत्री धर्मरावबाबा आत्रम यांनी आज भामरागड येथे पूर परिस्थितीचे पाहणी करून आढावा घेतला. सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम, मुख्याधिकारी अभिजीत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण चौधरी, नायब तहसीलदार रेखा वाणी तसेच विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पर्लकोटा नदीला पूर आला व या पुराचे पाणी भामरागड तालुक्यातील गावात शिरले, त्यामुळे शेती व घरांची हानी झाली आहे. सध्या सध्या पाऊस थांबल्याने पुराचा जोर कमी झाला आहे. या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी आज मंत्री धर्मावरबाबा आत्राम यांनी केली व नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आयुष्मान आरोग्य मंदिराचे १ लक्ष पेक्षा जास्त नागरिकांनी घेतले लाभ

Fri Sep 13 , 2024
– ४४५३ गरोदर मातांची सुद्धा तपासणी : आणखी १४ आरोग्य मंदिर सुरू होणार नागपूर :-  नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे संचालित करण्यात येणारे आयुष्मान आरोग्य मंदिर (आरोग्य वर्धिनी केंद्र) चा नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ मदत आहे.आता पर्यंत १,१८,६३० लाभार्थ्यांची बाह्यरुग्ण विभागात निशुल्क तपासणी झाली असून ४४५३ गरोदर मातांची सुद्धा तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य मंदिरात सर्व सेवा नि:शुल्क उपलब्ध करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!