– दक्षिण-पश्चिममध्ये निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
नागपूर :- देशासह नागपुरातही बेरोजगारी वाढली आहे. तरुणांना नोकरीसाठी मुंबई-पुणे- बंगळूरु गाठावे लागत आहे. सत्ताधाऱ्यांना दहा वर्ष दिल्यावरही तरुणाईच्या रोजगाराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही आहे. तसेच ज्या नोकऱ्या होत्या त्याही सत्ताधाऱ्यांनी कमी केल्या. त्यामुळे आणखी किती वर्ष तरुणाईने रोजगारासाठी नागपूर सोडावं असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित करुन यंदा परिवर्तन घडविल्याशिवाय राहणार नसल्याचे मत नागरिकांनी कॉंग्रेसच्या जन आशीर्वाद यात्रेत बोलून दाखवला असल्याचे इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास पांडूरंग ठाकरे यांनी सांगितले.
मंगळवारी (ता. २ एप्रिल २०२४) रोजी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रात पश्चिम नागपूरात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली होती. यात्रेची सुरुवात गिट्टीखदान चौक येथून झाली तर याचा समारोप गोधनी नाका मार्गावर झाला. तसेच दुसऱ्या सत्राची यात्रा छावनी येथून होऊन गवलीपुरा मार्गे मनपा कार्यालयात समारोप झाला. यावेळी प्रामुख्याने अनिस अहमद, विशाल मुत्तेमवार तौसिफ खान, संजय भिलकर, प्रमोदसिंग ठाकूर, देवेंद्रसिंह रोटेले, राजकुमार कमनानी यांची उपस्थिती होती. यात्रेत मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
इंडिया आघाडीच्या निवडणूक प्रचार कार्यालयाची सुरुवात दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघात प्रतापनगर येथे झाली. यावेळी प्रामुख्याने विकास ठाकरे, विनोद गुडधे पाटील, मुकुंदराव पन्नासे, विशाल मुत्तेमवार, प्रफुल गुडधे पाटील, रेखा बाराहाते यांच्यासह मोठ्यासंख्येत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
विकास ठाकरे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने उभीः शरद पवार
देशात सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाविरुद्ध आणि हुकुमशाहीविरुद्धच्या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांच्यापाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे. शहरातील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता विकास ठाकरे यांच्या समर्थनात नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याची ग्वाही शरद पवार यांनी दिली. सोमवारी रात्री राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या निवास्थानी शरद पवार आणि विकास ठाकरे यांची भेट झाली. यावेळी निवडणूकीच्या रणनिती संदर्भात प्रमुख चर्चा झाली.
आज दक्षिण-पश्चिमच्या मतदारांना भेटणार विकास ठाकरे
बुधवारी (ता. ३ एप्रिल) रोजी सकाळी ७.३० वाजता जन आशीर्वाद यात्रेला शिवनगाव येथून सुरुवात होईल. त्यानंतर जयताळा, त्रिमूर्तीनगर, सुभाषनगर, गोपाल नगर, अभ्यंकरनगर, बजाजनगर येथे यात्रेच्या पहिल्या टप्प्याचे समारोप होईल. तर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सायंकाळी ४.३० वाजता धंतोली येथून अजनी, छत्रपतीनगर, सोमलवाडा, खामला, टेलिकॉमनगर, भेंडे लेआऊट, सोनेगाव येथून जाणार असून सहकार नगर येथे समारोप होईल.
काँग्रेसच्या न्यायचे मतदारांकडून स्वागत
काँग्रेसकडून पाच न्यायाचे संकल्प घेऊन तरुण, शेतकरी, महिला, मजूर आणि भागीदारीचे जनतेकडून स्वागत होत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाचे मॉडल काँग्रेसने मांडले असून आमची कॉंग्रेसला साथ असल्याची ग्वाही यावेळी जनतेने दिली.