नझूल जमिनीसाठी विशेष अभय योजना

मुंबई :- नागपूर व अमरावती विभागातील निवासी कारणांसाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनींसाठी विशेष अभय योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ही अभय योजना ज्या नझूल जमिनी निवासी कारणांसाठी लिलावाद्धारे, प्रिमिअम अथवा अन्यप्रकारे भाडे तत्त्वावर दिल्या आहेत त्यांनाच ३१ जुलै २०२५ पर्यंत लागू राहील. नझूल जमिनीच्या फ्रि होल्ड (भोगवटादार-१) करण्यासाठी जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील बाजारमुल्याच्या २ टक्के एवढा प्रिमिअम आकारण्यात येईल. फ्रि होल्ड करण्यासाठी अन्य अटी शर्ती कायम राहतील. नझूल जमिनीचे वार्षिक भूभाड्याची आकारणी विहित प्रचलित दराने ३१ जुलै २०२५ पूर्वी कालमर्यादेत भरणे अनिवार्य असेल. त्यानंतर भूभाडे न भरल्यास थकीत भूभाडे व त्यावर वार्षिक १० टक्के व दंडनीय व्याज आकारण्यात येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नागपूर व चंद्रपूर दौरा

Tue Mar 12 , 2024
नागपूर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, मंगळवार दि. १२ मार्च रोजी नागपूर आणि चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल. दुपारी ४.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी ५ वाजता मोरवा विमानतळ हेलिपॅड चंद्रपूर येथे आगमन व मोटारीने वन अकादमी चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी 5.15 वाजता वन अकादमी येथे आगमन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com