गृहमंत्री अमित शाह यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

नागपूर :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागपूर विमानतळावर आज प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे नागपूर विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने आगमन झाले. त्यानंतर ते छिंदवाडा येथील कार्यक्रमासाठी विमानतळावरूनच रवाना झालेत.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. विमानतळावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी,सह पोलीस आयुक्त अश्विनी दोरजे,विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे,गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस व अन्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूर विमानतळावरून विशेष हेलीकॅप्टरने ते छिंदवाडाकडे रवाना झालेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘दि मॅजेस्टिक’ आमदार निवासाच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन

Sat Mar 25 , 2023
मुंबई :- ‘दि मॅजेस्टिक’ या महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अतिथीगृहाच्या तथा आमदार निवास वास्तूच्या नूतनीकरण कामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याचबरोबर या वास्तूच्या कोनशीलेचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com