गृहखातं सांभाळताना ‘हे’ कराच; अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना सल्ला

कोल्हापूर :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या चिरंजीवी हॉटेलचा उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. इथं बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना गृहखात्याबाबत महत्वाचा सल्ला दिलाय.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडं गृहखातं आहे. फडणवीसांनी त्या पोलीस खात्यात आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे, असं अजित पवार म्हणालेत.

भाजपत अनेक नेते जाणार असल्याचे दावे करण्यात येत आहेत. मात्र असे दावे अनेक वर्ष करण्यात येत आहेत. ज्या वेळेस हे दावे खरे ठरतील. त्यावेळेस या दाव्यांना महत्त्व असेल, असं अजित पवार म्हणालेत.

महागाई , बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यावर दुर्लक्ष करण्यासाठी असे दावे केले जात आहेत. अशा पद्धतीने बातम्या देऊन ते नेमकं काय साध्य करतात. हे अजून पर्यंत कळलेलं नाही. अशा बातम्यांमुळे पेट्रोल दरवाढ कमी होणार आहे का सिलेंडरच्या किमती कमी होणार आहेत का तरुणांना रोजगार मिळणार आहेत का? ज्यांच्या हातात सरकार असतं त्यांनी प्रशासनावर एक जरब बसवली पाहिजे. पोलीस खातं ज्यांच्याकडे आहे त्या देवेंद्र फडणवीस यांनी त्या पोलीस खात्यात आदर युक्त दबदबा निर्माण केला पाहिजे, अजित पवार यांनी म्हटलं आहे.

NewsToday24x7

Next Post

धावत्या रेल्वेखाली डोके ठेवून अनोळखी तरुणाची आत्महत्या

Sat May 20 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक कामठी रेल्वे स्टेशन हद्दीत येणाऱ्या रेल्वे की. मी .नं. 1116/15 मार्गाहुन धावत असलेल्या रेल्वे गाडीसमोर डोके ठेवून अनोळखी तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गतरात्री साडे नऊ वाजता घडली असून आत्महत्येचे कारण अजूनही कळू न शकल्याने आत्महत्येचे कारण व अनोळखी तरुणाची ओळख अजूनही गुलदस्त्यात आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com