संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाचे नगर परिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन.
कन्हान :- शहरातील राष्ट्रीय महामार्ग वरील बंद असलेली हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जागा विकल्या नंतर त्या जागेवर वाढीव दराने शहर आणि सिटी प्रमाणे विक्री करीत असल्याने स्थानिक दुकानदारांमध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याने दुकांनदारांनी नप मुख्याधिकारी अर्चना मेंढे, नगराध्यक्षा करूणा आष्टणकर यांची भेट घेऊन, चर्चा करून त्यांना निवेदन देऊन बंद असलेली हिंदुस्तान लिव्हर कंपनीच्या जागेवर मार्केट यार्ड, हाॅकर्स झोन, साप्ताहिक व गुजरी बाजार, भाजीपाला विक्रेता दुकानदार, बस स्टैंड करिता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सुध्दा देण्यात आला आहे.
मौजा कन्हान-पिपरी येथील बंद पडलेल्या औद्योगिक कंपनी ब्रुक बॉन्ड ही हिंदुस्तान लिव्हर लि. कंपनीला विकण्यात आली. ही कंपनी चालु होऊन शहरात रोजगार मिळणार परंतु हिंदुस्तान लिव्हर लि. कंपनी सुध्दा बंदच राहिल्याने जागा ओसाड झालेल्या अवस्थेत असल्याने (दि.५) नोंव्हेबर २०१८ ला कन्हान- कांद्री दुकानदार महासंघाच्या पदाधिकारी व दुकानदारांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन हिंदुस्तान लिव्हर कंपनीच्या जागेवर मार्केट यार्ड, हाॅकर्स झोन, साप्ता हिक व गुजरी बाजार, भाजीपाला विक्रेता दुकानदार, बस स्टैंड आणि शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता उपयोगात घेण्याची मागणी केली होती. परंतु नगरपरिषद प्रशासनाने सदर विषया कडे गंभीर्याने लक्ष केंन्द्रीत न केल्याने हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जागा विकण्यात आली. यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासा वर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील कित्येक वर्षापासुन शहरात रिकामी जागा नसल्याने राष्ट्रीय चारपदरी महा मार्गावर फुटपाथ, गुजरी आणि साप्ताहिक बाजार भरत असल्याने नागरिकांना व दुकानदाराना जिव मुठीत घेऊन सामानाची खरेदी विक्री करावी लागत आहे. यास्तव विविध संघटने द्वारे अनेकदा नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन प्रशासनाने हिंदुस्तान लिव्हर कंपनीची रिकामी जागा विकत घेण्याची मागणी केलेली आहे. नगरप्रशासनाने शासनाला सैधा पत्र व्यवहार सुद्धा न केल्याने आज हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जागा बाहेरील काही लोकांना विकण्यात आल्याने समोर फुटपाथ वर बसलेले दुकानदाराना हटविण्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. साप्ताहिक व गुजरी बाजार रस्त्यावर भरत असुन बस स्थानकाची जागे अभावी व्यवस्था नाही. पोलीस स्टेशनला सुध्दा जागा नसताना त्यांची व्यवस्था कुठे होईल असा प्रश्न असताना सुुध्दा हिंन्दुस्तान लिव्हर कंपनीची जागा ज्यांनी विकत घेतली. त्या जागेवर वाढीव दराने शहरा प्रमाणे, स्मार्ट सिटी प्रमाणे प्लाॅट विक्री करीत असल्याने संबंधीत ले-आउट चे दस्ताऐवजाची कायदेशीर चौकशी करून रोकथाम लावण्या यावे. आणि ही जागा नगर परिषदेने शहराच्या विकासाकरिता सरकारच्या माध्य मातुन खरेदी करून येथे मार्केट यार्ड, हॉकर्स झोन, चिल्लर, ठोक भाजीपाला विक्रेता दुकानदार, साप्ता हिक व गुजरी बाजार, बस स्थानक, पोलीस स्टेशन आदी शहराचा सर्वांगीन विकासाच्या दुष्टीने या एकमेव असलेल्या जागेचा उपयोग करावा. अशी मागणी दुकानदार बांधवांनी नप मुख्याधिकारी अर्चना मेंढे, नगराध्यक्षा करूणा आष्टणकर हयांना निवेदन देऊन केली आहे. जर मागणी वर सुध्दा जाणीव पुर्वक अमलबजावणी करण्यात न आल्यास तीव्र आंदोलना चा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी कन्हान- कांद्री दुकानदार महासंघ अध्यक्ष अकरम कुरैशी, सचिव प्रशांत मसार, प्रदीप गायकवाड, सचिन गजभिये, नितिन रंगारी, ऋृषभ बावनकर, चिराल वैध, अमोल मोहबे, गजानन कपाटे, रणवीर पात्रे, जावेद सैयद, शिवशंकर हालमारे सह दुकानदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.