कृषिमाल काढणीत्तोर व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज आमंत्रित

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

नागपूर :- शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फलोत्पादन पिकांचे मूल्यवर्धन, प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके व त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत काढणीत्तोर व्यवस्थापन घटकासाठी शेतक-यांनी २०२२-२३ या वर्षासाठी प्रकल्पाच्या बांधकामासाठी महाडीबीटी पोर्टलवर (mahadbtmahait.gov.in) अर्ज करावेत किंवा कृषि कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक डॉ. रवींद्र भोसले यांनी केले आहे.

हे अर्थसहाय्य एकूण प्रकल्प बांधणीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या साधारण आणि डोंगराळ व अधिसूचित क्षेत्रासाठी ३५ ते ५० टक्के अनुदान दिले जाते. त्यामुळे जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत आकारमाननिहाय हे देय अनुदान राहणार आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषि माल, फळे आदी बाबींची या योजनेंतर्गंत एकात्मिक पॅक हाऊस, पूर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांची उभारणीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. उत्पादित फलोत्पादन, औषधी, सुगंधी मालाची साफसफाई, प्रतवारी व पॅकिंग करून दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढवणे तसेच मोठ्या प्रमाणावर फलोत्पादन पिकांच्या मालाची आवक वाढवून बाजारमूल्य शेतक-यांना कमी मिळते. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता एकात्मिक पॅक हाऊस, पूर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी इ. प्रकल्पांना प्रोत्साहन व अर्थसहाय्य दिले जाते, असेही भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor constitutes Search Committees for selection of Mumbai, Pune and Sanskrit Varsity VCs

Sat Oct 1 , 2022
Mumbai :-  The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari in his capacity as Chancellor of universities has constituted search committees for the selection of new vice chancellors for the University of Mumbai, Savitribai Phule Pune University and the Kavikulaguru Kalidas Sanskrit University. Justice Yatindra Singh (Retd.) former Chief Justice of Chhattisgarh High Court will be the Chairman of the Search […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com