अतिवृष्टी नुकसान आढावा सभा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 22 :- जिल्हा परिषद सदस्य प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात मागील १५-२० दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचे तसेच घराचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्या संदर्भात आज समाज भवन तरोडी (बु) येथे आढावा सभा घेण्यात आली. या सभेमध्ये प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची सखोल चौकशी करून त्वरित अहवाल सादर करावा असे सांगितले. आणि नुकसान ग्रस्त शेतकरी यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा व कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली. तसेच जिल्हा परिषद चे कनिष्ठ अभियंता यांचे कडून रस्ता, पूल, सी डी वर्क यांच्या झालेल्या नुकसान विषयी आढावा घेतला.
याप्रसंगी जिल्हा परोषद सदस्य प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे, उपसभापती आशिष मल्लेवार,दिलीपजी वंजारी सदस्य पं.स. कामठी, डाखोळे सर विस्तार अधिकारी पं.स. कामठी, अनवाने सर मंडळ अधिकारी, लोखंडे सर कृषी अधिकारी कामठी, तसेच सर्व सन्मानीय सरपंच, उपसरपंच, सचिव,कृषी सहाय्यक आणि सर्कल मधील प्रतिनिधी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कुंभारे कॉलोनीत मोकाट डुकराचा इसमावर हल्ला

Fri Jul 22 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -हल्ल्यात इसम गंभीर जख्मि,जख्मि इसमाच्या हाताच्या बोटाला चावा कामठी ता प्र 22 :- कामठी नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षित पनामुळे शहरात मोकाट कुत्रे तसेच मोकाट डुकरांचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे. या मोकाट कुत्रे तसेच मोकाट डुकरांचा चावा घेणे हे नित्याचेच झाले आहे.मागील काही महिन्यात खुद्द कामठी नगर परिषदचे सेवानिवृत्त कर्मचारी खुशाल सपाटे यांचा कुत्रा चावल्याने मृत्यू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com