संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-हल्ल्यात इसम गंभीर जख्मि,जख्मि इसमाच्या हाताच्या बोटाला चावा
कामठी ता प्र 22 :- कामठी नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षित पनामुळे शहरात मोकाट कुत्रे तसेच मोकाट डुकरांचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे. या मोकाट कुत्रे तसेच मोकाट डुकरांचा चावा घेणे हे नित्याचेच झाले आहे.मागील काही महिन्यात खुद्द कामठी नगर परिषदचे सेवानिवृत्त कर्मचारी खुशाल सपाटे यांचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती तर नुकतेच दहा दिवसांपूर्वी कामठी शहरातील कादर झेंडा परिसरात जंगली डुकराचा शिरकाव होत दोघांना चावा घेतल्याची घटना घडली होती या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी या घटनेला काही दिवसांचा विराम मिळत नाही तोच काल रात्री साडे दहा दरम्यान कुंभारे कॉलोनीत एका मोकाट डुकराच्या हल्ल्यात घरी जेवन करीत असलेल्या इसम गंभीर जख्मि झाल्याची घटना घडली.जख्मि इसमाचे नाव ताराचंद नारायण सोमकुवर वय 55 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर जख्मि इसम हा रात्री साडे दहा दरम्यान स्वतःच्या घरी जेवन करीत असता मोकाट फिरनाऱ्या एका डुकराने घरात शिरून हल्ला चढविला.या डुकराला मज्जाव केला असता पिसाळलेल्या या डुकराने सदर इसमाच्या हातपंज्याच्या बोटाला चावा घेऊन अर्धा बोट खाल्ल्याची दुर्दैवी घटना घडली.दरम्यान घरात भीतीमय वातावरण पसरले होते.घटनेची माहिती मिळताच परिसरातील रहिवासी माजी नगरसेवक प्रतीक पडोळे, उदास बन्सोड, विनोद बंसोड, गौतम माटे, आकाश भोकरे, अंकुश गजभिये आदींनी मदतीची धाव घेत त्वरित जख्मिला उपचारार्थ कामठी च्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले मात्र जख्मिची परिस्थिती नाजूक असल्याने सदर जख्मि ला नागपूर ला मेयो इस्पितळात हलविण्यात आले.
-कामठी शहरात या प्रकारच्या घटनेला वाव मिळत असून मोकाट जनावरांचा चावा होण्याच्या घटनेची वारंवार पुनरावृत्ती न व्हावी तसेच कुणाची जीवितहानी न व्हावी यासाठी स्थानिक नगर परिषद प्रशासनाने गंभोर्याची भूमिका घेत मोकाट कुत्रे व मोकाट डुकर पकड मोहीम राबवावी असे आव्हान कुंभारे कॉलोनी रहिवासी उदास बंसोड यांनी केले आहे.