
मोहपा :- नारायणा विद्यालयम कोराडी रोड नागपूर येथे विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करून ‘नायशा’ वार्षिक क्रीडा दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला शब्द सुमनाने व पुष्पगुछ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मशाल पेटवून पाहुण्यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. शाळेतील विदयार्थ्यांनी मार्च पास्ट करून पाहुण्यांना सलामी दिली. याप्रसंगी रिले, तीन पायाची दौड, मल्लखांब, मनोरे, लेझीम, बकेट शो (तुटलेल्या बेकेट वाजवत कचऱ्यातून संगीत कला सादर केली), एरोबिक्स सादर करताना भारताचा नकाशा व शाळेचे नाव (NVK) तयार केले. हा क्षण अंगावर शहारे आणणारा आणि उत्कृष्ट क्षण ठरला. अशा प्रकारच्या अनेक क्रीडा शाळेच्या विदयार्थ्यांनी सादर केल्या. या कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ग्रुप कॅप्टन ब्रिजेश कुमार चव्हाण, डॉ. इंद्रजित बसू व शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री नटराजन प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे क्रीडा शिक्षक गौरव रेड्डी, हिमांशी बुडापवार, उर्वेजा कुर्वे व नितीन मालवडे यांनी मोलाची कामगिरी केली. तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अमूल्य सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संचालन उत्कर्ष जेठानी, अनुष्का उमाले व क्षितिज बोरकर या शाळेच्या विदयार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे व्यवस्थापक राहूल दामले यांनी केले.
