संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 22 :- जिल्हा परिषद सदस्य प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात मागील १५-२० दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचे तसेच घराचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्या संदर्भात आज समाज भवन तरोडी (बु) येथे आढावा सभा घेण्यात आली. या सभेमध्ये प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची सखोल चौकशी करून त्वरित अहवाल सादर करावा असे सांगितले. आणि नुकसान ग्रस्त शेतकरी यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा व कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली. तसेच जिल्हा परिषद चे कनिष्ठ अभियंता यांचे कडून रस्ता, पूल, सी डी वर्क यांच्या झालेल्या नुकसान विषयी आढावा घेतला.
याप्रसंगी जिल्हा परोषद सदस्य प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे, उपसभापती आशिष मल्लेवार,दिलीपजी वंजारी सदस्य पं.स. कामठी, डाखोळे सर विस्तार अधिकारी पं.स. कामठी, अनवाने सर मंडळ अधिकारी, लोखंडे सर कृषी अधिकारी कामठी, तसेच सर्व सन्मानीय सरपंच, उपसरपंच, सचिव,कृषी सहाय्यक आणि सर्कल मधील प्रतिनिधी उपस्थित होते.