आरोग्य समिती सभापतींनी शहरातील दहन घाटांची केली पाहणी

– दहन घाट स्वच्छ ठेवण्याबाबत दिले निर्देश

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती श्री. महेश (संजय) महाजन यांनी शुक्रवारी (ता. १८) शहरातील चार दहन घाटांचा दौरा करून पाहणी केली. तसेच शहरातील सर्व दहन घाटांची सफाई करून स्वच्छ ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महाले, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनच्या मुख्य स्वच्छता अधिकारी धर्मेंद्र पाटील, दिनेश कालवडे, राजीव राजूरकर आदी उपस्थित होते.

          शुक्रवारी  आरोग्य समिती सभापती श्री. महेश (संजय) महाजन यांनी  घाट रोडवरील मोक्षधाम, मानेवाडा घाट, गंगाबाई घाट आणि शांतीनगर घाटाचा दौरा केला. पाहणी दरम्यान  सभापतींनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. काही दहन घाटांवर पाण्याच्या पाईपलाईनमध्ये असलेली गळती तात्काळ बंद करण्याचे निर्देशही दिले. मानेवाडा घाट आणि शांतीनगर घाटावरील स्वच्छता पाहून सभापतींनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच मोक्षधाम आणि गंगाबाई घाटाची दररोज साफसफाई करण्याची सूचना दिली.

          यावेळी सभापतींनी घाटावर आलेल्या मृत व्यक्तींच्या परिवारासोबत चर्चा करून घाटावरील व्यवस्थेबद्दल विचारणा केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

केंद्र ने कुमार विश्वास को 'वाई' श्रेणी की सुरक्षा प्रदान की!

Sun Feb 20 , 2022
नई दिल्ली  – केंद्र ने कवि कुमार विश्वास को चौबीसों घंटे ‘Y’ सुरक्षा प्रदान करने का फैसला किया है, जब उन्होंने आम आदमी पार्टी के प्रमुख और दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पर पंजाब में विधानसभा चुनाव के लिए हाई-वोल्टेज अभियान के दौरान अलगाववादियों का समर्थन करने का आरोप लगाया था। सूत्रों ने बताया कि मंत्रालय ने शनिवार को कुमार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com