नागपूर :- महात्मा बसेश्वर यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. उपायुक्त चंद्रभान पराते यांनी महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त प्रदिप कुलकर्णी, सहायक संचालक शंकर बळी, तहसिलदार अरविंद सेलोकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
महात्मा बसेश्वर यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे यांनी महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी पुजा पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..