ग्राहकांनो विजेसंबंधी माहितीसाठी आपला मोबाईल क्रमांक नोंदविला का?

नागपूर :- विजेसंदर्भातील विविध समस्या, प्रश्न यासाठी आता महावितरण कार्यालयात फोन करण्याची अथवा खेटा मारण्याची आता आवश्यकता नाही. महावितरणच्या मोबाईल ॲप किंवा ‘ऊर्जा’चॅटबॉट वर ग्राहकांना त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. सोबतच त्यांना तक्रार देखील करता येणार आहे. मात्र त्यासाठी ग्राहकांनी आधी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद महावितरणकडे करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात वादळी वारे व विजांच्या गडगडाटासह पाऊस असतो व अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी विजेचे पोल पडणे तसेच तारा पडणे, वारंवार वीज खंडित होणे आदी समस्या या कालावधीत मोठ्या प्रमाणावर घडतात, अशा परिस्थितीत कोणत्या ठिकाणी काय समस्या आली आहे याबद्दल ग्राहकांना माहिती मिळत नाही. या सुविधा ग्राहकांना मिळाव्यात याकरिता महावितरणाने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे व याचेच परिणीती म्हणून महावितरणच्या ‘महावितरण मोबाईल अॅप’ आणि ‘ऊर्जा’चॅटबॉट विकसित केले आहे. या माध्यमातून माध्यमातून ग्राहकाला त्यांच्या वीज बिलाची माहिती, वीजबिलाचा भरणा, विजेच्या तक्रारी, नवीन वीजजोडणीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.

वेबसाईट : ग्राहकांना सहजपणे विविध सुविधा मिळाव्यात तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी व्हावे यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in संकेतस्थळावर ही सर्व माहिती विस्तृतपणे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप : महावितरणकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा लाभ ग्राहकांना मिळावा. यासाठी आवश्यक माहिती, ग्राहकांच्या तक्रारी आदींसाठी महावितरणच्या मोबाइल अॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. महावितरणचे हे ॲप गुगल प्ले स्टोर्स आणि ॲपल ॲप स्टोर्सवर उपलब्ध आहे.

महावितरण कॉल सेंटर :- वीज पुरवठा, वीज देयक आणि इतर संदर्भातील तक्रारींसाठी महावितरणचे 24 X7 असलेले कॉल सेंटर ग्राहक सेवेसाठी सदैव सज्ज आहे. येथे तक्रार नोंदविण्यासाठी 1912/19120/ 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या क्रमांकावर कॉल करुन ग्राहक तक्रर नोंदवू शकतो

ऊर्जा चॅटबॉट : नवीन वीजजोडणी वा त्यासाठी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती, वीजबिल भरणा किंवा वीजबिलाचा तपशील, जलद वीजबिल भरणा, मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी इतर विविध शुल्कांचा ऑनलाइन भरणा, स्वतः मीटर वाचन व सबमिशन, गो-ग्रीन नोंदणी, वीज वापर व बिलाचे कॅल्क्युलेटर आदींबाबत वीजग्राहकांना ‘ऊर्जा’ चॅट बॉट 24 X7 थेट मदत करीत आहे.

अशी करा मोबाईल क्रमांकची नोंद : ग्राहकाला त्याच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी वा बदल करण्यासाठी करण्यासाठी MPEG<12 अंकी ग्राहक क्रमांक> असा एसएमएस 9930399303 या क्रमांकावर पाठवायचा आहे, अथवा महावितरणच्या संकेतस्थळावरुन आणि मोबाईल ऍप वरुन देखील ग्राहकाला त्याच्या मोबाईल क्रमांकाची नोंद किंवा बदल करता येतो.

मोबाईल क्रमांक नोंदणीचे लाभ : मोबाईल क्रमांकाची नोंद असलेले वीज ग्राहक त्यांच्या नोंदणिकृत मोबाईलवरून 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल करून अथवा NOPOWER <12 अंकी ग्राहक क्रमांक> असा एसएमएस 9930399303 या क्रमांकावर पाठवून वीज पुरवठा खंडित असल्याची तक्रार देवू शकतात.

ग्राहकांना एका क्लिकवर विविध सुविधा मिळाव्यात, त्यांचा वेळ वाया जाऊ नये, त्यांना वीज संदर्भात वेळोवेळी अपडेट मिळावेत, ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी व्हावे यासाठी महावितरणने या सुविधा सुरु केल्या असून अधिकाधिक ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद करीत या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,महावितरण, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 112 प्रकरणांची नोंद

Sat May 18 , 2024
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (ता. 17) रोजी उपद्रव शोध पथकाने 112 प्रकरणांची नोंद करून 55 हजार 900 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com