कामठी तालुक्यात हरितालिका गौरीपूजन उत्साहात साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा परंपरागत चालत आलेला भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया म्हणजेच ‘हरितालिका पूजन’ कार्यक्रम कामठी तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. तर अखंड सौभाग्याचे वरदान मिळावे यासाठी मोठ्या संख्येतील सुवासिनींनी कामठी छावणी परिषद हद्दीतील श्री तीर्थक्षेत्र महादेव घाट कन्हान नदीत हरितालिकेची पूजा करीत गौरीविसर्जन केले .तसेच ग्रामीण भागात सोयीच्या ठिकाणी गौरीविसर्जन करण्यात आले.

या हरितालिका गौरी पूजन उत्साह नुसार कामठी तालुक्यातील महिलांनी नऊ दिवस अगोदरच गौर म्हणून एका परडीवर गाईच्या शेणाची बारीक चुर करून त्यात गहू टाकले आणि मग ते हरितालिकेच्या दिवशी गौरी पूजन करून गौरीची हळद, कुंकू, बेल फुल वाहून पूजा करून आंघोळ घातले आणि महिला सौभाग्याचे लेन म्हणून एकमेकांच्या घरी जाऊन टोपलीचे वाण दिले आणि दुसऱ्या दिवशी अनेक महिलानि एकत्र येऊन सकाळी गौरी हातात घेऊन नवीन वस्त्र परिधान करुन येथील श्री तीर्थक्षेत्र महादेव घाट कन्हान नदीवर जाऊन आरती पूजा करून गौरीचे विसर्जन केले .तसेच ग्रामीण भागातील महिलांनी सोयीच्या ठिकानी गौरीविसर्जन केले. गौरीविसर्जन कार्यक्रमात कुठलीही अनुचित घटना न घडो यासाठी सतर्कता बाळगत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी कडक पोलिस बंदोबस्त लावला होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गणेशोत्सवात नियमांचे पालन करून सणोत्सव शांततेत साजरे करा

Sat Sep 7 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आजपासून सुरू झालेला दहा दिवसीय श्री गणेशोत्सव तसेच आगामी काही दिवसानंतर होणाऱ्या ईद ए मिलाद यासारखे सणोत्सव साजरे होणार आहेत.तरी नागरिकानी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आगामी सणोत्सव सलोख्याने व शांततेत साजरे करावेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे .महापूरुषांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या भूमीत गणेशोत्सवासह आगामी उत्सव सन मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com