शिवशक्ती नगरात हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम आज

– श्री हनुमान सेवा पंच कमिटी शिवशक्ती नगर नं. 2 व 3 च्यावतीने हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर :- दक्षिण नपुरातील श्री हनुमान सेवा पंच कमिटी शिवशक्ती नगर नंबर 2 व 3 मानेवाडा रिंग रोड नागपूर येथे मंगळवारी 23 एप्रिल रोजी, श्री हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मंगळवारी सकाळी 6:00 वा. पूजा अभिषेक (हनुमान जन्म) दुपारी 3:00 वाजता. भजन व गोपालकाला सायंकाळी 7:00 वाजता. भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमात उपस्थित राहून सहकार्य करावे तसेच वस्तीतील नागरिकांनी सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत असून मंदिरात धान्य व इतरही काही दान करायचे असल्यास मंदिरात देणगी स्वीकारल्या जाईल. शिवशक्ती नगरातील कार्यकर्ते हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने परिश्रम घेत आहे. असे श्री हनुमान सेवा पंच कमिटी च्यावतीने प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुही पोलीसांची अवैध्य रेती माफीयावर धडक कार्यवाही

Tue Apr 23 , 2024
कुही :- ह‌द्दीतील उमरेड ते कुही रोडने अवैध्यरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. अश्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून दि. २१/०४/२०२४ चे रात्री ०१.०० वा. पोलीस स्टेशन कुही येथील अधिकारी व स्टॉफ सह वरीष्ठांना माहिती देवुन दिपक अग्रवाल सा. भापोसे तथा ठाणेदार पोस्टे कुही यांचे नेतृत्वात सिल्ली शिवार येथे नाकाबंदी दरम्यान १२ चक्का टिप्पर क्र. एम. एच. ४०/सी टी-७९६२ चा चालक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com