
नागपूर, दि.27 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज राजभवन येथे मुंबई येथून आगमन झाले. राज्यपालांच्या आगमनप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.४ चे उपविभागीय अभियंता लक्ष्मीकांत राऊळकर व शाखा अभियंता सचिन भोंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, शिक्षण विभाग उपसचिव प्राची जांभेकर, राजभवन नागपूर येथील राज्यपालांचे पारिवारिक प्रबंधक रमेश येवले यांची उपस्थिती होती.
