संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
काटोल:- काटोल येथे वंचित बहुजन आघाडीचे डॉ बाबासाहेब आंबेडकर.चौक ते एस डी ओ कार्यालयावर मोर्चा काढुन जातीयवादी सरकार व सरकारच्या मताने चालणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात तिव्र घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
…लवकरात लवकर आरोपींना फाशी न दिल्यास संपुर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन करणार दिगांबर डोंगरे यांनी इशारा दिला.
तहसीलदार काटोल यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल मुख्यमंत्री गृहमंत्री सामाजिक न्यायमंत्री व राज्याचे पोलीस महासंचालकाना दिगांबर डोंगरे यांच्या नेत्रुत्वात व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले.
…महाराष्ट्रातील नांदेड जिल्हय़ात बोन्ढार हवेली या गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी का केली या आकसापोटी सवर्ण समाजातील गुंडांनी अक्षय भालेराव या गरीब कुटुंबातील तरुणाची घरात घुसून हत्त्या केली ही घटना फुले शाहु शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेबांच्या विचाराच्या महाराष्ट्राला कलंकित करणारी आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणे हा गुन्हा कसाकाय ठरू शकतो
…त्याचप्रमाणे अकोला जिल्यातील हीना मेश्राम ही मुंबईत मंत्रालयाच्या जवळ असलेल्या सावित्रीबाई फुले वस्तिग्रुहात इंजिनियर चे प्रशिक्षण घेत असलेली तरुणीवर तेथील गार्ड व ईतर चार जणानी पाशवी बलात्कार करून तिची हत्त्या केली ही घटना तर कुन्भकर्नी झोपेत असलेल्या मस्तावलेल्या सरकारला काळे फासन्यासारखी आहे दोन्ही घटना घडुन पंधरा दिवस झाले असुनही या ठिकाणी आजपर्यंत एकही आमदार खासदार मंत्री किवा प्रशासणातला पोलीस वीभागातला मोठा अधिकारी गेला नाही की साधी चौकशीही केली नाही स्वताहाला खूब महान व हुशार समजणारे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दोन्ही घटनानाबाबत ब्र.सुद्धा काढला नाही यावरून हे सरकार दलित अत्याचाराबाबत गंभीर नाही की आरोपींना वाचवण्यासाठी सारी शक्ती लावत आहे का असा प्रश्न दलित समाजासमोर पडत आहे
….या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ आज काटोल येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष दिगांबर डोंगरे यांच्या नेतृत्वात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात तिव्र आंदोलन करत सरकारच्या व प्रशासनाच्या व आरोपींच्या विरोधात तिव्र घोषणाबाजी करत डॉ आंबेडकर चौक ते एस डी ओ कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले.
आरोपींना तात्काळ अटक करून फाशी द्यावी हे प्रकरण फास्ट ट्र्याक कोर्टात चालवून अँड उज्वल निकम यांना पीडितांच्या बाजुने नियुक्त करावे.दोन्ही कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी दोन्ही कुटुंबाला प्रत्येकी 50लाख रु आर्थिक मदत द्यावी. सावित्रीबाई फुले वस्तीगृहाचे संचालक व अधिक्षकावर 302ची केस लावुन आजन्म कारावासाची शिक्षा द्यावी. अशाप्रकारचे निवेदन देत सरकारने याकडे गंभीरतेणे पाहून कारवाई केली नाही तर संपुर्ण दलित समाज भाजप सरकारला सत्तेच्या खाली खेचल्याशीवाय राहणार नाही असा इशारा दिगांबर डोंगरे यांनी दिला आहे
..आंदोलनात व निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष.तथा न प काटोल चे माजी सभापती दिगांबर डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष सुमेध गोंडाने काटोल तालुका कार्याध्यक्ष श्रीकांत गौरखेडे काटोल शहर अध्यक्ष सुधाकर कावळे.पत्रकार विजय डोंगरे सतीश पाटील सिद्धार्थ कुकडे पारडसिंगा ग्रामपंचायत चे वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष दिनेश तायडे सुरेश देशभ्रतार अनंतराव सोमकुवर विजय दहाट. गुलाबराव शेंडे बाबाराव तागडे तुकाराम देशभ्रतार रामराव पाटील अजय बागडे गौतम फुले संभाजी सोनुले बाबाराव गोंडाने अशोकराव बागडे प्रफुल्ल तागडे ओंकार मलवे दिपक तागडे मोतीलाल निकोसे प्रकाश निस्वादे बादल वासनिक सुरज दुपारे गौरव पाटील जिवन वाहने नीळकंठ गजभिये राजेन्द्र बागडे प्रदिप जाधव नामदेव रक्षित गुलाबराव तागडे सुरज मून यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते