शताब्दी चौकातील बोधीवृक्ष तोडू नये – उत्तम शेवडे

नागपूर :- दक्षिण व दक्षिण पश्चिम नागपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर शताब्दी चौकात एका मोठ्या रुग्णालयाचे बांधकाम सुरू असून त्या रुग्णालयात जाण्या येण्यासाठी ॲम्बुलन्स किंवा फायर च्या गाडीला त्रास होऊ नये म्हणून चौकातील 35 वर्षाचे बोधिवृक्ष (पिंपळ) तोडण्याची जाहीर परवानगी मागण्यात आली होती त्यावर बसपा नेते उत्तम शेवडे व अन्य तीन लोकांनी लिखित आक्षेप घेतले आहेत.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षी 1991 ला जोगीनगर येथील मिडल रिंगरोड चे कार्य सुरू झाले. त्यातील रोड पीडितांचे पुनर्वसन करून तिथे शताब्दी नगर व डॉ बाबासाहेब आंबेडकर शताब्दी चौक निर्माण करण्यात आला. या वसाहतीत बहुतेक बौद्ध समाजाची मंडळी असल्याने त्यांनी 24 तास ऑक्सिजन देणाऱ्या व बुद्धाचे प्रतीक म्हणून समजल्या जाणाऱ्या बोधीवृक्षांचे रोपण व जतन केले. त्यामुळे मुख्य चौक व परिसरात अनेक डौलदार बोधिवृक्ष उभे झालेत.

मागील 30-35 वर्षात या वृक्षामुळे कोणत्याही वाहनांना अडथळा निर्माण झाला नाही. अलीकडे तीन-चार वर्षात खुल्या वादग्रस्त जागेवर एका हॉस्पिटलची निर्मिती होत असून त्या हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्सला जाण्या येण्यासाठी त्रास होणार असल्याचे दाखवून हॉस्पिटलचे संचालक प्रा बबन तायवाडे यांनी नॅशनल संदेश व दैनिक महासागर या वृत्तपत्रात मनपाच्या माध्यमातून 28 जुलै ला जाहिरात देऊन त्या 35 वर्षाच्या बोधिवृक्षाला तोडण्याची परवानगी मागितली होती. 

त्या जाहिरातीवर बहुजन समाज पार्टीचे मा प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, भारतीय दलित पॅंथरचे प्रकाश बनसोड, माजी नगरसेवक व ऑनलाईन आरएसएस चे संस्थापक अध्यक्ष जनार्दन मून तसेच माजी नगरसेविका नंदा झोडापे, त्यांचे पती सुनील झोडापे व परिसरातील नागरिकांनी बोधिवृक्षाचे झाड तोडण्यावर लेखी आक्षेप घेतले आहेत. झाडे लावा झाडे जगवा ही शासनाची मोहीम असताना विनाकारण झाडे तोडा ही मोहीम कधीपासून सुरू केली असाही प्रश्न तक्रार कर्त्यांनी विचारला आहे.

सुनावणी पुढे ढकलली 

आज 23 ऑगस्ट रोजी या विषयावर सुनावणी होती. अर्जदार-तक्रारकर्ते हजरही झाले. परंतु उद्यान अधीक्षक चौरपगार यांना अचानक आलेल्या कामामुळे त्यांनी ती सुनावणी सोमवार पर्यंत पुढे ढकलली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 73 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Thu Aug 24 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (23) रोजी शोध पथकाने 73 प्रकरणांची नोंद करून 54100 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com