नागपूर :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने नागपूर जिल्हा महानगरपालिका कामगार संघटना (नियो.) तर्फे अभिवादन करण्यात आले. नागपूर शहरातील संविधान चौक स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संघटनेचे अध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी संघटनेचे लोकेश मेश्राम, रोशन बारमासे, ऍड. राहुल झांबरे,मंगेश गोस्वामी, विश्वास नगरकर, अनिल रंगारी, अखिलेश तागडे, गौरव वानखेडे, तत्वराज देशपांडे, भोला हरिश्चंद्र खोब्रागडे, प्रकाश ढोके, प्रफुल्ल रंगारी, सुरज धनविजय, शंकर राव मेश्राम, रॉबिन गजभिये, जितेंद्र पौणिकर, राहुल वाघमारे, अनमोल गडपायले, सुषमा बोरकर, उर्वशी गडपायले, भाग्यश्री बाबूनकर, दिगंबर मेश्राम यांच्यासह संघटनेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.