संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- बहुजन समाज पार्टी, कामठी – मौदा विधानसभेतर्फे डी एस फोर, बामसेफ,व बहुजन समाज पार्टीचे संस्थापक मान्यवर कांशीराम यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त बहुजन समाज पार्टी कामठी मौदा विधानसभा तर्फे सामूहिक अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जयस्तंभ चौक स्थित भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास माल्याअर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेऊन कांशीराम यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन वाहण्यात आले. यावेळेस कामठी विधानसभेचे अध्यक्ष इंजि. विक्रांत मेश्राम यांनी कांशीराम साहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकत आठवण करून दिली की मान्यवर कांशीरामजी यांनी आपला संपूर्ण आयुष्य महापुरुषांच्या विचाराला गतिमान केले होते , इ.स. १९७८ साली कांशीराम यांनी बामसेफ (“बॅकवर्ड ॲन्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लॉयीज फेडरेशन”) या संघाची स्थापना केली. हा संघ बिगरराजकीय, बिगरधार्मिक स्वरूपाचा होता. इ.स. १९८१ सालापासून त्यांनी दलितांना एकीकरण साधण्याच्या हेतूने प्रयत्न आरंभले. यातून इ.स. १९८४ साली त्यांनी बहुजन समाज पक्ष स्थापला. बहुजन समाज पक्षास उत्तर प्रदेशात बऱ्यापैकी यश कमवता आले.
कांशीराम इ.स. १९९१ साली १०व्या लोकसभेत होशियारपूर मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेले. इ.स. १९९६ साली ११व्या लोकसभा निवडणुकांत ते पुन्हा निवडणूक जिंकली. व महापुरुषाचा आंदोलन कसा यशस्वी करून दाखवला यावर ईजि. विक्रांत मेश्राम यांनी आपले विचार मांडले तर बसपा स्टार प्रचारक मोहम्मद सफी यांनी समयोचित मार्गदर्शन करून विनम्र अभिवादन केले .
याप्रसंगी कामठी नगर परिषद चे माजी सभापती रमा गजभिये ,सुधा रंगारी, विनय ऊके, अनिल कुरील , रवी मधुमटके, निशिकांत टेंभेकर, विशाल गजभिये, नागसेन गजभिये, माजी नगरसेवक विकास रंगारी, संप्पदीप मेश्राम, मोनल खोब्रागडे ,दिवाकर गोस्वामी ,राजन मेश्राम ,रंजू विनोद मेश्राम, दिपाली गजभिये, प्रतिभा नागदेवे, गुरूपाल बोरकर, प्रशांत गजभिये, राहुल बागडे, सोमकुवर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.