मानसिक तणावातून तरुणाची गळफास लावून आत्महत्या..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 9 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या फुल ओली चौक रहिवासी एका विवाहित तरुणाने दारूच्या सवयाधीन राहून मानसिक तणावातून स्वतःच्या घरातच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी 7 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव दीपक उर्फ बंटीबावा गडे वय 35 वर्षे रा फुल ओली चौक कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक तरुण हा विवाहित असून मागील सहा वर्षांपूर्वी वैवाहिक कलहातून मृतकाची पत्नी पतीपासून दूर राहत होती तर सदर मृतक हा दारूच्या आहारी गेल्याने व्यसनाधीन झाला होता. आज दुपारी राहत्या घरातील स्वतःच्या खोलीत झोपले असता बराच वेळ होऊनही खोलीबाहेर न आल्याने घरमंडळींनी आवाज दिला असता खोलीतून कुठलेही प्रतिउत्तर न आल्याने खोलीत गेले असता सदर मृतक गळफास लावलेल्या स्थितीत आढळल्याने सर्वांना एकच धक्का बसला.यासंदर्भात त्वरित जुनी कामठी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात पुढील उत्तरीय तपसणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ARMY OPENS SITABULDI FORT.

Mon Oct 10 , 2022
Nagpur – Sitabuldi Fort was opened to public on 09 Oct 2022. The Nagpurians came out in large numbers to visit the heritage fort and enjoy its historic ambiance.   Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com