– सद्भावना दिवसची घेतली शपथ
नागपूर :- देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयात आयोजित छोट्या ठिकाणी कार्यक्रमात मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अजय चारठाणकर यांनी उपस्थितांना सद्भावना दिवस ची शपथ दिली.
यावेळी उपायुक्त प्रकाश वराडे, अधिक्षक राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, प्रमोद हिवसे, अमोल तपासे, राजेश लिहीतकर यांच्यासह इतर कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.