संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शनिवार पासून सलग तीन दिवस कामठी तालुक्यासह नागपूर जिल्ह्याला वादळी वारे ,अवकाळी पाऊस ,व गारपीटीमुळे तडाखा बसतो आहे.गरपीटीमुले उदभवलेल्या संकटाने शेतकरी हतबल झाला आहे.शेतातील काढणीला आलेल्या पिकांना जबर फटका बसला आहे तसेच शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे व फळबागाचे अतोनात नुकसान झाले आहे.गहू,हरभरा,ज्वारी या पिकांचा घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.अनेक शेतकऱ्यांनी गहू,ज्वारी व हरभरा कापून वाळवण्यासाठी शेतात ढिगारे रचून ठेवले होते.तर काही शेतकऱ्यांची पिके काढणीला आले होते.
गारपीट व पावसाचा जोर आणखी काही दिवस असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.त्यात शेतमालाचे आणखी नुकसान होणार आहे. या भीतीने शेतकरी चिंतातुर आहे.माजी राज्यमंत्री व बहुजन रिब्लिकन एकता मंच च्या संयोजिका ऍड सुलेखा कुंभारे यांनी नागपूर जिल्हाधिकारी यांना आज मंगळवारी पत्र पाठवून शेतकऱ्यावर ओढावलेल्या या संकटाच्या काळात महसूल प्रशासनाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.