– खदानीच्या डबक्यात बुडुन १६ वर्षीय मुलाचा मृत्यु
– परसोडा शिवारातील खदानीच्या डबक्यातील घटना
रामटेक :- रामटेक जवळील मनसर माईन येथील वार्ड क्रमांक ३ येथे राहणारा चंद्रपाल रमेश इंगळे ( वय १६ वर्षे ) हा मुलगा १८ नोव्हेंबरच्या दुपारी वाहीटोला जवळील परसोडा शिवाराच्या माईनच्या ओपन काष्ट खदानच्या खोल पाण्यात बुडाला होता.
तेव्हापासून काल सायंकाळपर्यंत मृत चंद्रपालचा मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू होते.काल संध्याकाळी थांबलेली शोधमोहीम १९ नोव्हेंबरच्या सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली. आज सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास स्थानिक शोधकर्त्यांच्या सहकार्याने पोलिसांनी चंद्रपालच्या मृतदेहाला पुन्हा शोधायला सुरुवात केली. खोल पाणी असल्यामुळे मृतदेह केव्हा सापडेल याबाबतीत साशंकता असतानाच ११:०० वाजताच्या सुमारास शोधकर्त्यांनी कसोशीने प्रयत्न करून मृतदेह पाण्याखालून वर आणला. नंतर लगेच पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे यांच्या उपस्थितीत समोरच्या कारवाईसाठी मृतदेहाला रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.तेथील पोस्टमार्टम रिपोर्ट आणि पोलिसी तपासानंतर चंद्रपालच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.मृतकाच्या मागे आई वडील दोघ्या बहिणी असून तो एकुलता एक मुलगा होता.घटनेचा संपूर्ण तपास रामटेक पोलिसांद्वारे पोलीस उपनिरीक्षक संजय खोब्रागडे करीत आहे.