९२५ किलो प्लास्टीक जप्त, मनपा उपद्रव शोध पथकाची कारवाई

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे बिनबा गेट परिसरातील शांती ट्रेडर्स या गोदामावर धाड टाकुन ९२५ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले असुन प्लास्टीकचा साठा करणाऱ्या सरवन सिंग राठोड यांच्याकडुन ५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

सदर कारवाई आयुक्त यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ.अमोल शेळके,प्रदीप मडावी, संतोष गर्गेलवार,शुभम खोटे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण पथक व स्वच्छता विभागातर्फे करण्यात आली असुन सदर गोदाम मालकास पुन्हा प्लास्टीकचा साठा व वापर न करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. प्लास्टीक बंदीसाठी मनपा मार्फत ” उपद्रव शोध पथक ” ( NDS ) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठाने, दुकानांवर कारवाई सुरु आहे.दरम्यान प्लास्टीक पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जाणार आहे. 

एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.

चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिलेले असुन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत मनपाच्या तीनही झोननिहाय कारवाईत संयुक्तपणे मोहीम राबवून शहरातील व्यवसाय प्रतिष्ठाने, दुकाने यांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

NewsToday24x7

Next Post

पोळा सणानिमित्त कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद.

Wed Sep 13 , 2023
नागपूर,१३ता. “पोळा सनानिमित्त” गुरूवार १४ सप्टेंबर रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहे.या संदर्भातील आदेश मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहेत. उपायुक्त यांच्या आदेशानुसार, “पोळा सनानिमित्त” गुरूवार दिनांक १४ सप्टेंबर २०२३ ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक ०२/०९/२०१८ रोजीच्या स्थगित साधारण […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com