कन्हान कांद्री व टेकाडी येथे राज्यव्यापी जनसंवाद यात्रेला उत्तम प्रतिसाद 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- महाराष्ट्र काॅंग्रेस कमेटीच्या आदेशानुसार पारशिवनी तालुका काॅंग्रेस पार्टी व्दारे गांधी चौक कन्हान येथुन (दि.८) सप्टेंबर ला पारशिवनी तालुक्या तील राज्यव्यापी जनसंवाद यात्रेची सुरूवात होताच कन्हान, कांद्री व टेकाडी येथे उत्तम प्रतिसाद मिळाला.

शुक्रवार (दि.८) सप्टेंबर ला सकाळी गांधी चौक कन्हान येथे महाराष्ट्र काॅंग्रेस कमेटी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करुन जनसंवाद यात्रेची सुरूवात करण्यात आली. ही जनसंवाद यात्रा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मार्गदर्शनात काॅंग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी मंत्री व आमदार सुनिल केदार, माजी जि प अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे, तालुका अध्यक्ष दयाराम भोयर यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रीय महामार्गाने भ्रमण करित आंबेडकर चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यास राजेंद्र मुळक यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन यात्रा राष्ट्रीय महामार्गाने कांद्री येथील गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला रश्मी बर्वे यांचा हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन करित राष्ट्रीय महामार्गाने टेकाडी फाटा येथे जनसंवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले.

यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या नाना पटोले यांना लिखित निवेदन देऊन मांडल्या व तात्काळ समस्या कडे लक्ष केंन्द्रीत करुन सोडविण्याची मागणी केली. टेकाडी फाटा येथे उपस्थितानी अल्पोहार करुन जनसंवाद यात्रा चारचाकी वाहनाने पारशिवनी कडे प्रस्थान केले. जनसवांद यात्रा वराडा, वाघोली, डुमरी स्टेशन, शेती फार्म, आमडी फाटावरून नयाकुंड, पालोरा मार्गे पारशिवनी येथे पोहचुन इंदिरा नगर बोरबन, बाजार चौक, जुना बस स्टॉप, शिवाजी चौक, बँक ऑफ इंडिया, सरकारी दवाखान्याच्या पाठी मागुन त्रंबकेश्वर मंदिर सह आदि मार्गाने भ्रमण करुन तालुका काँग्रेस कार्यालय जिनिंग येथे जनसंवाद यात्रा समाप्त झाल्यानतंर बाजार चौक पारशिवनी येथे जाहिर सभेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

जनसंवाद यात्रेत काॅंग्रेस पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थि त होत सहभाग घेतल्याने कन्हान कांद्री व टेकाडी येथे राज्यव्यापी जनसंवाद यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चोऱ्या करणे बंद कर म्हटल्याने आरोपीने चाकु ने मारुन केले गंभीर जख्मी

Fri Sep 8 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस ७ किमी अंतरावर असलेल्या गोंडेगाव येथे नरेश नेवारे किराणा जवळ भीमराव यानी चोऱ्या करणे बंद कर असे म्हटले असता आरोपी विजय मेश्राम ने चाकुने मारुन गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी आरोपीला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. प्राप्त माहिती नुसार गुरूवार (दि.७) सप्टेंबर ला भीमराव वल्द माणिक मेश्राम वय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com