खैरीत तीन दिवसीय राष्ट्रीय उडबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

-आठ राज्याचे संघ सहभागी

कामठी :- महाराष्ट्र राज्य उडबाल असोसिएशनच्या वतीने कामठी नागपूर मार्गावरील खैरी शिवारातील महाराजां लॉन येथे पुरुष -महिला गटातील उडबाल राष्ट्रीय स्पर्धेचे थाटात उद्घाटन करण्यात आले . राष्ट्रीय खुला गट पुरुष महिला वूडवाल स्पर्धेचे उद्घाटन उत्तर नागपूरचे माजी आमदार डॉक्टर मिलिंद माने यांचे हस्ते दीपप्रज्वलन व क्रीडांगणाची पूजा तसेच खेळाडूचा परिचय करून करण्यात आले .यावेळी माजी आमदार सुधाकर कोहळे, उडबाल असोसिएशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी अजय सोनटक्के, उडबॉल असोसिएशन इंडियाचे कोषाध्यक्ष प्रवीण मानवटकर, माजी नगरसेवक रमेश चोपडे, माजी नगरसेवक रमेश माटे ,उपप्राचार्य सुदाम राखडे उपस्थित होते .

राष्ट्रीय उडबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना माजी आमदार सुधाकर कोहळे म्हणाले राष्ट्रीय उडबॉल असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्रवीण मानवटकर यांच्या अथक प्रयासाने उडबॉल स्पर्धेची यशस्वी वाटचाल आपल्या विदर्भ राज्य आणि देशात होत आहे त्यांनी आज नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरातील खैरी सारख्या ग्रामीण भागात राष्ट्रीय उडबॉल स्पर्धेचे आयोजन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण करण्यासाठी उपक्रम केला त्याबद्दल त्यांचे व सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो या राष्ट्रीय स्पर्धेत विविध राज्यातून सहभागी झालेल्या खेळाडूंचे स्वागत करून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

राष्ट्रीय उडवाल स्पर्धेत विविध छत्तीसगड ,झारखंड, आंध्रप्रदेश, राजस्थान ,उत्तराखंड ,हरियाणा, तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातील पुरुष व महिला संघ सहभागी झाले आहे .स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सुदीप मानवटकर ,अभिषेक आत्राम, हेमंत पवार ,संतोष वाघ ,तुषार जाधव ,राजेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, कपिल शास्त्री, पंच व सहकाऱ्यांसोबत परिश्रम घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामगढात इसमाचा झोपेतच मृत्यु

Sat Jan 14 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामगढ रहिवासी इसमाचा झोपेतच अकस्मात मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी अडीच वाजता घडली असून मृतकाचे नाव जितेंद्र प्रेमणारायन सोनी वय 54 वर्षे रा शिवली बौद्ध विहार जवळ ,रामगढ कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा काही वर्षोपूर्वी कामठी रेल्वे स्टेशन जवळ रिक्षाचालक म्हणून कार्यरत होता.पत्नीशी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!