शिवजयंती निमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार सदानंद सरवणकर, मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन बृहन्मुंबई महानगर पालिका व श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले होते.

अभिवादन सोहळ्यानंतर राज्यपाल क्रीडा भवन येथे महानगरपालिकेतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील उपस्थित राहिले. आज प्रथमच राष्ट्रगीतासोबत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत देखील गायले गेले.

यावेळी महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा, समूहगायन व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुरवासियों के लिए माझी मेट्रो बनाने में सफल हुए : डॉ. दीक्षित

Sun Feb 19 , 2023
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपुर मेट्रो रेल परियोजना) • मेट्रो भवन में मनाया ९वां स्थापना दिन नागपुर: नागपुर मेट्रो ने कई कीर्तिमान स्थापित करते हुए अनेक अच्छे कार्य किए हैं । इसके अलावा नगरवासियों के चेहरों माझी मेट्रो की खुशी का हमें गर्व है । उक्त उदगार प्रबंध निदेशक डॉ. बृजेश दीक्षित ने व्यक्त किए वे 9वें स्थापना दिवस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!