मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

नितीन लिल्हारे

मोहाडी : देशात दिवसेंदिवस बेरोजगारी महागाई वाढत असून या महागाई मुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमती आधी वाढवून नंतर कमी केलें त्यामुळें काहीच फरक पडला नाही. तसेच भाजपा सरकार सत्तेत बसली तेव्हा पासून देशात बेरोजगारी वाढली आहे. लोकांच्या हाताला काम नाही अनेक रोजगार बंद पडले आहे. तसेच भंडारा जिल्हा हा धान उत्पादन जिल्हा असून शेतकऱ्यांच्या धानाला चांगला भाव द्यावा व खरेदी केंद्र सुरू करावे असा अनेक मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वात तुमसर तालुक्यांतील खापा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी प्रणित भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत विक्रमी दरवाढ केलेली आहे. त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता या महागाईने होरपळलेली आहे. एकीकडे देशात सुमारे एक ते दीड वर्षापासून कोरोना महामारीचे मोठे संकट कोसळले आहे. त्यातच सर्वसामान्य जनतेचा रोजगार गेलेला आहे. जनतेच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. एकीकडे भरमसाठ महागाईने डोके वर काढलेले असून त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. महागाईमुळे सर्वत्र जनतेत चिंता वाढली आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने त्वरित पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ मागे घ्यावी. व धानाला तीन हजार रुपये क्विंटल देण्यात यावा, शेतकऱ्याकडून उन्हाळी धानाची खरेदी प्रति हेक्टरी ५० क्विंटल करण्यात यावे, भेल साखरखाना सुरू करण्यात यावा, केंद्र सरकारने बेरोजगार साठी रोजगार उपलब्ध करुन द्यावे, जीवनाशक्यवस्तूंच्या किंमती कमी करण्यात यावे अशा अनेक मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेचा विचार करून त्यांना दिलासा द्यावा. अन्यथा पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने उपविभागीय अधिकारी तुमसर यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.
याप्रसंगी माजी विधान परिषद सदस्य राजू जैन, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुधे, माजी खासदार मधुकर कुकडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, विठ्ठल कहालकर विधानसभा अध्यक्ष, तुमसर अध्यक्ष देवचंद ठाकरे, मोहाडी सदाशिव ढेंगे, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे,ठाकचंद मुंगुसमारे, राजेंद्र मेहर, रंजूताई कारेमोरे, रिताताई हलमारे, रितेश वासनिक, आनंद मलेवार, महादेव पचघरे, नरेश ईश्वरकर, राजू देशब्रतार, राजू ढबाले, पमा ठाकूर, प्रतिमा राखडे, गायधणे, सुभाष गायधणे,अनिता गिरेपुंजे, जयश्री गभने, बाळा समरीत, सुरेश रहांगडाले, विठ्ठल रहमकर, एकनाथ फेंडर, असे दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते शेकडोच्या संख्येत उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शेकडो च्या वर नागरीकानी केले स्वेच्छेने रक्तदान

Fri May 27 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 27:-केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामठी शहरच्या वतीने जयस्तंभ चौक स्थित भाजप कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात शेकडो च्या वर संख्येतील नागरीकानी स्वेच्छेने रक्तदान केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा मनीष वाजपेयी ,भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया,कार्याध्यक्ष राजेश खंडेलवाल ,माजी नगरसेवक लाल सिंग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com