कन्हान :- पोलीस स्टेशन येथे राज्यपाल पुरस्कार भुषविणारे पोलीस पाटील मनोज मेहुणे यांचा सत्कार कार्यक्रम थाटात पार पडला.
कळमेश्वर तालुक्यातील उबाळा गावाचे मनोज मेहुणे वर्ष २०१६ पासुन पोलीस पाटील म्हणुन कार्यर त असुन मनोज मेहुणे यांचा उल्लेखनिय सेवेच्या सन्मानार्थ २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी कस्तुरचंद पार्क नागपुर येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या वतीने महाराष्ट्र शासन पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार महसुल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या पार्श्वभुमीवर पोलीस पाटील महाराष्ट्र राज्य संघटनाच्या वतीने शनिवार (दि.१) फेब्रुवारी ला कन्हान पोलीस स्टेशन येथे राज्यपाल पुरस्कार भुषविणारे पोलीस पाटील मनोज मेहुणे यांचा सत्कार राज्याचे अध्यक्ष दिपक बाबु पालिवाल, जिल्हाध्यक्ष मारोती ठाकरे, सहसचिव गुंडेराव चकोले, पोलीस निरि क्षक राजेंद्र पाटील यांचा प्रमुख उपस्थितीत पोलीस पाटील मनोज मेहुणे यांचा शाॅल, श्रीफल आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व दिनदर्शिकाचे वितरण करण्यात आले. अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अजय ईखार यांनी तर आभार योगेश नांदुरक र हयांनी व्यकत केले. याप्रसंगी कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील संघटना अध्यक्ष लोमेश्वर गडे, उपाध्यक्ष श्रीकृष्ण कुथे, सहसचिव निखिल बागडे, कोषाध्यक्ष नरेंद्र राऊत, कृणाल ब्राम्हणे, अजय ईखार, संदीप नेहुल, राहुल कालबेले, प्रदीप ऊके, शालु घरडे, सोनु गेडाम, योगेश नांदुरकर, संजय नेवारे, संदीप भोले, संतोष ठाकरे, अरविंद गजभिये, चक्रधर वासनि क, कैलाश कारेमोरे, विकास हटवार, शुभम बल्लारे आदी पोलीस पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.