राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनियतेची शपथ

– ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधी सोहळा

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

नागपूर :- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा पार पडला. समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची उपस्थिती होती.

https://www.facebook.com/share/p/1XzhaS3ab2/

समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक ऊईके, शंभुराज देसाई, अँड.आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंह भोसले, अँड.माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय सिरसाठ, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद जाधव पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबीटकर यांचा समावेश आहे.

सोबतच 6 सदस्यांना राज्यपालांनी राज्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यात माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर साकोरे, इंद्रनील नाईक, योगेश कदम यांचा समावेश आहे. शपथविधी सोहळ्याचे संचलन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले. सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली. सोहळ्यास खासदार, आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधानमंडल के शीतकालीन सत्र की पूर्व संध्या पर मंत्रिपरिषद की बैठक संपन्न

Mon Dec 16 , 2024
नागपुर :- महाराष्ट्र विधानमंडल के शीतकालीन सत्र की पूर्व संध्या पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में राज्य मंत्रिपरिषद की बैठक आज यहां संपन्न हुई। बैठक मुख्यमंत्री के शासकीय निवास ‘रामगिरि’ में आयोजित की गई। इस बैठक में उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार के साथ मंत्रिमंडल में नवनियुक्त सदस्य मंत्री, राज्यमंत्री उपस्थित थे। बैठक के प्रारंभ में राज्य के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!