प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग योजनेंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

नागपूर :- ‘प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग’योजनेंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योजकांसाठी सुवर्णसंधी असून या योजनेसाठी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी केले आहे.

केंद्र शासन पुरुस्कृत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना सन 2020-21 पासुन ते सन 2024-25 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक मालकी/भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी कंपनी या शासकीय व खासगी वैयक्तिक तसेच संस्थांना एकुण प्रकल्प किमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त 10 लाखपर्यंत अनुदान लाभ देय्य आहे. अन्न प्रक्रीया उद्योगाच्या पतमर्यादा वाढविणे, उत्पादनांचे ब्रॅडींग व विपणन अधिक बळकट करुन संघटीत साखळीशी जोडणे, सामाईक प्रक्रीया सुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वंकष सेवांचा सुक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे हे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेंचे प्रमुख उद्देश आहेत.

सुक्ष्म अन्न प्रक्रीया गट उद्योगांना सामाईक पायाभुत सुविधा करीता गट लाभार्थी/ शेतकरी उत्पादक संस्था/ शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयं सहायता गट आणि त्यांचे फेडरेशन शासकीय संस्था. यांना प्रकल्प किंमतीच्या 35%,जास्तीत जास्त 3.00 कोटी पर्यंत अनुदान लाभ मिळणार आहे. मार्केटींग व ब्रॅन्डींग करीता शेतकरी उत्पादक संस्था/ शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी, स्वयं सहायता गट यांचे समुह अथवा यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या 50%, कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहीत करण्यात येईल. तसेच सुक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना लाभ (इन्क्युबेशन केंद्र/ मुल्यसाखळी) शेतकरी उत्पादक संस्था/ शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयं सहायता गट आणि त्यांचे फेडरेशन शासकीय संस्था यांना प्रकल्प किंमतीच्या 35%, जास्तीत जास्त 3.00 कोटी आहे.

अर्ज कोण करू शकते – शेतकरी, युवक, उद्योजक, शेतकरी कंपन्या, शेतकरी बचतगट, महिला बचतगट, विविध कार्यकारी संस्था.

अन्नप्रक्रिया उद्योग-

दूध प्रक्रिया : खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप, लस्सी.

मसाले प्रक्रिया : चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला, मटण-चिकन मसाला, गोडा मसाला. शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारल्याची चटणी, जवसाची चटणी.

पालेभाज्या व फळे प्रक्रिया : आंबा, सिताफळ, पेरू, सफरचंद, आवळा, मोसंबी, लिंबू, चिंच, बोर, जांभूळ इत्यादीपासूनचा प्रक्रिया उद्योग, जाम, जेली, आईस्क्रीम, रबडी, काजू, बदाम, पिस्ता, बेदाणा, ड्रायफ्रूट इत्यादी रेडी टू इट प्रक्रिया अंतर्गत येणारे सर्व खाद्यपदार्थ पॅकिंग ब्रॅण्डिंग सह सर्व प्रकारचे फळे तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या प्रक्रिया उद्योग यात येतात.

तेलघाणा प्रक्रिया : शेंगदाणा, सोयाबीन, सुर्यफुल, तीळ, बदाम व सर्व प्रकारची तेल उत्पादने.

पावडर उत्पादन प्रक्रिया : काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स, ज्वारी, गहू, मिर्ची, धना, जिरा, गुळ, हळद.

पशुखाद्य निर्मिती : मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य इ.

कडधान्य प्रक्रिया : हरभरा व इतर डाळी(पॉलिश करणे), बेसन तयार करणे इ.

राईस मिल : चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इ.

बेकरी उत्पादन प्रक्रिया : बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट, नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चिरमुरे.

इच्छूकांनीकेंद्र शासनाच्या https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयांशी तसेच जिल्हा संसाधन व्यक्ती यांचाशी संपर्क करावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के नेतृत्व में पहली बार भारत में रोग निवारक स्वास्थ्य सेवाओं पर ध्यान दिया गया है - डॉ. जितेंद्र सिंह

Sat Apr 8 , 2023
भारतीय युवाओं की ऊर्जा एवं क्षमता का उपयोग अमृत काल के लिए किया जाना चाहिए: डॉ. जितेंद्र सिंह भारत ने कोविड से बचाव के लिए दो डीएनए टीके तथा एक नासिका से दिए जाने वाले टीके का उत्पादन किया है और इसे 130 देशों को कोविड से लड़ने के लिए उपलब्ध कराया गया है: डॉ. जितेंद्र सिंह भारतीय अनुसंधान, भारतीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com