गोवर रुबेला लसीकरणास विशेष प्राधान्य द्या – जिल्हाधिका-यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश

नागपूर :- जिल्ह्यात गोवर रुबेला विशेष लसीकरणाच्या मोहीमेची पहिली फेरी १५ ते २५ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. तर दुसरी फेरी १५ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहीमेला आरोग्य विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले.

गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीमेची आढावा बैठक आज जिल्हाधिका-यांचा अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. दीपक सेलोकर यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गोवर रुबेलाचा राज्यातील काही भागात प्रादूर्भाव पहायला मिळत आहे. हा धोका ओळखून जिल्ह्यात गोवर रुबेलाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. यासाठी दोन टप्प्यांमध्ये लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गोवर, रुबेलाचे लसीकरण न झालेल्या पालकांनी आपल्या पाल्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे. आरोग्य यंत्रणेला सर्वसामान्यांचे सहकार्य या मोहीमेसाठी आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी बैठकीदम्यान म्हणाले.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वसतिगृहातील प्रवेशासाठी 16 डिसेंबर; स्पॉट ॲडमिशन

Thu Dec 15 , 2022
नागपूर :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृहाची सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता प्रवेश प्रकिया पूर्ण करण्यात आलेली असून पहिल्या व दुस-या प्रवेश निवड यादी व्यतिरिक्त रिक्त जागेवर स्पॉट ॲडमिशनची तारीख 15 डिसेंबर निश्चित करण्यात आलेली होती. परंतु काही कारणास्तव स्पॉट ॲडमिशनची तारीख एक दिवस पुढे ढकलण्यात आली असून शासकीय वसतिगृहांच्या स्पॉट ॲडमिशन 16 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com