आरपीआय च्या मजबुतीसाठी सदैव तत्पर-प्रदेश उपाध्यक्ष प्रा प्रमोद चहांदे..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 12:परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रेरणेतून आणि त्यांचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने पाच ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाची स्थापना झाली. तत्पूर्वी डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष बरखास्त करून शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना केली होती. या पक्षातर्फे त्यांनी १९४६ आणि १९५२; तसेच १९५७ मध्ये झालेल्या निवडणुका लढवून यशदेखील मिळविले होते. डॉ. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण होण्यापूर्वी त्यांनी मनोदय व्यक्त केला होता की, पुरोगामी समाजघटकांना सामावून घेणारा पक्ष स्थापन करावा. त्यातून आरपीआय पक्ष निर्माण झाला. व पक्षाचे अध्यक्ष म्हणून पी. एन. राजभोज यांची निवड झाली होती .आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(गवई)चा पदाधिकारी म्हणून पक्षाचा शिपाई असे कर्तव्यदक्ष भूमिका साकारत असताना रिपाई च्या मजबुती व बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे मौलिक मत रिपाई चे नागपूर प्रदेश उपाध्यक्ष प्रा प्रमोद चहांदे यांनी आज एका छोटेखानी कार्यक्रमात व्यक्त केले. तसेच आरपीआय (गवई)मध्ये कार्यरत असलेले प्रत्येकजण पक्षाची ताकद वाढवीत आहेत. तसेच राज्यात एकूण मतदारांच्या सुमारे पाच ते सहा टक्के एकगठ्ठा मते असतानाही त्याची प्रत्येक निवडणुकीत होणारी विभागणी रोखण्यासाठी सर्व आंबेडकरी पक्षाच्या ऐक्याची ताकद दाखविण्याची अतिशय गरज असल्याचेही मत व्यक्त केले.

याप्रसंगी आंबेडकरी कार्यकर्ते दिनेश पाटील,राजेश गजभिये, महेंद्र कापसे,उदास बन्सोड,दिपंकर गणवीर,प्रमोद गेडाम,कोमल लेंढारे,आशिष मेश्राम,मंगेश-खांडेकर , आनंदभाऊ,विकास रंगारी,गीतेश सुखदेवें,सुभाष सोमकुवर, आनंद गेडाम ,सुमित गेडाम आदी उपस्थित होते .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

खाड़े जैसे WCL के हर खदान में दर्जनों 'दामाद'..?

Sun Feb 12 , 2023
नागपुर – WCL के खदानों की शुरुआत कामचोर,निकम्मों अर्थात बिना काम के मासिक वेतन सह सुविधा उठाने वालों से हुई हैं.क्यूंकि इस श्रेणी के लोग चापलूसी का उद्योग चलाते हैं या फिर किसी न किसी अधिकारी के ‘भक्त’ या सर्व-सुविधा उपलब्ध करवाने वाले नुमाइंदे होते हैं.आज की सूरत में वेकोलि के हर खदान में ऐसे निकम्मों और कामचोरों की संख्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com