संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर मेट्रो रिजन अंतर्गत येणाऱ्या कामठी तालुक्यातील भिलगाव ग्रा प हद्दीतील जुने पक्के घरे व दुकाने एन एम आर डी ए च्या वतीने पाडण्यात येणार असल्याने संबंधित ग्रामवासीयांचे आर्थिक नुकसान होणार आहे.व नुकसानधारक ग्रामस्थ तसेच दुकानदारांना आर्थिक नुकसानीच्या ओझ्याखाली आत्महत्ये शिवाय पर्याय राहणार नाही.तेव्हा या करवाहिस थांबा देत भिलगाव ग्रामपंचायतीला नगर पंचायत चा दर्जा देण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य लतेश्वरी ब्रह्मा काळे यांनी माजी मंत्री व भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.