संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- पारशिवनी तालुका अंतर्गत गाव टेकाडी (को.ख.) येथे निराधार झालेल्या महिलांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने माजी मंत्री श्री. राजेंद्र मुळक यां चा सामाजिक उपक्रमांतर्गत राजेंद्र मुळक सहायता कक्षाच्या माध्यमाने शिलाई मशिन भेट स्वरूप देण्यात आली.
सोमवार (दि.४) ला पारशिवणी तालुका अंतर्गत टेकाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) येथे निराधार महिला श्रीमती नलिनी सुर्यभान सातपैसे राह. टेकाडी यांना राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटी) यांच्या सहायता कक्षा द्वारे महिला सक्षमी करणाच्या माध्यमाने स्वयंरोजगार निर्माण करून स्वत : च्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करता यावा, या उद्देशाने शिलाई मशिन भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी ग्राम पंचायत सदस्य सतिश घारड, मारोती हूड, अशोक राऊत, आकाश कडू, सुनिल आंबागडे, प्रविण चव्हाण, विशाधर कांबळे, सचिन हूड, पूनम भोवते, शांताबाई सात पैशे, हर्षली हूड आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थि त होते. याप्रसंगी सर्वांनी या सामाजिक कार्याकरिता राजेंद्र मुळक यांचे आभार व्यक्तं केले.